शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गीता आणि कुराण संवादाचे प्रभावी माध्यम : हनिफ खान शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 19:47 IST

पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितले.

ठळक मुद्देसंगमनेरात सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत गीतेवर व्याख्यान

संगमनेर : पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितलेले तत्वज्ञान फक्त वेगळ्या लिपीत आणि भाषेत कुराणात सांगितले आहे. हे दोन्ही महान धार्मिक ग्रंथ म्हणजे वादाचे नव्हे तर संवादाचे प्रभावी माध्यम आहेत, असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. मोहम्मद हनीफ खान शास्त्री यांनी केले.गीता परिवाराच्या वतीने भंडारी मंगल कार्यालयात गीतेतील वैश्विक विचार या विषयावर बुधवारी डॉ. खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे विचार सप्रमाण मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवान जोशी तर व्यासपीठावर गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेर शाखाप्रमुख सतीश इटप उपस्थित होते.डॉ. खान म्हणाले, गीता आणि कुराण यांची केवळ लिपी भिन्न आहे. बारकाईने अभ्यास केला तर दोन्हींचा गाभा एकच आहे. दोन्ही ग्रंथ सद्भावना, बंधुत्व आणि मानवतेचा पुरस्कार करणारे आहेत. द्वेषभावनेचा जराही लवलेश या महान ग्रंथांमध्ये नाही. डॉ. खान यांनी वेद, गीता, कुराण, अरण्यके, उपनिषदे यातील दाखले देत या सर्वांची शिकवण मानवतेच्या मुल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यात तिरस्काराला तसूभरही वाव नाही असे सांगीतले. राजकीय लाभासाठी आणि दोन समुदाय परस्परांशी झुंजविण्यासाठी आजवर त्यांचा दुरुपयोग होत आला. ही दुदैर्वाची गोष्ट असुन गीता ही अखिल विश्वातील मानवजातीला भारताने दिलेली सर्वोत्तम भेट आहे असल्याचे डॉ. खान म्हणाले.मुस्लीम समाजाच्या वतीने जुबेर इनामदार, डॉ. जी. पी. शेख, साजिद पठाण यांनी डॉ. खान यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश डागा व अभिजित गाडेकर यांनी केले. सतीश इटप यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता भांदुर्गे यांनी विशेष परिश्रम घेतले. संगमनेरातील सर्वधर्मीय नागरिकांनी हे व्याखान ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर