शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिस्त मोडणा-यांना पक्ष भूईसपाट करतो - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:54 IST

आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर : जो शिवसेनेचा पदाधिकारी शिस्त मोडण्याचे काम करतो, त्यांना पक्ष भूईसपाट करतो. शिवशेनेची नाळ ही सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे. आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.पाच कोटी रुपयांच्या पळसपूर ते पोखरी रस्ता व कामटवाडी, खडकवाडी व वारणवाडी येथील नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत तीन बंधा-यांच्या विकास कामांच्या भूमिपजनप्रसंगी गुरुवारी खडकवाडी (ता. पारनेर) येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पारनेर तालुक्याचे आमदार विजय औटी हे होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, अशोक कटारिया, विकास रोहोकले, श्रीकांत पठारे, शिवाजी बेलेकर, राजेश भनगडे, बाबासाहेब तांबे, राहुल झावरे, सुरेश बोरुडे, ताराबाई चौधरी, उमाताई बोºहुडे, सुनीता झावरे, अप्पासाहेब शिंदे, साहेबराव वाफारे, ज्ञानदेव गागरे, किसनराव ढोकळे, अमोल रोकडे, डॉ.सुदाम आहेर, धनंजय ढोकळे, छायाताई शिंदे, ग्रामस्थ उपस्थित होते.शिंदे पुढे म्हणाले की, औटी यांनी पारनेर तालुक्याचा कायापालट करण्याचा चंग बांधला असून तालुक्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यात यशस्वी झाले आहेत. नदी पुनर्जीवन प्रकल्पाची संकल्पना औटी यांची आहे. मग राज्यात अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली. शासनाचा इतर निधी कसा आणायचा? कसा खर्च करायचा? याचा ताळमेळ व न्याय देण्याचे काम औटी करतात. त्यामुळे त्यांना जनतेने तीन वेळेस निवडून दिले, असे ते म्हणाले.रस्त्यांच्या कामांसाठी २२ कोटींचा निधी आणला आहे. यापुढील काळात पण अशीच विकास कामे करण्याचा माझा कायम प्रयत्न राहील, असे आमदार विजय औटी यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEknath Shindeएकनाथ शिंदेParnerपारनेरVijay Autiआ. विजय औटी