शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात ४१ रुग्ण वाढले, संगमनेर तालुक्यातील कुरण गावात २२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:02 IST

अहमदनगर : रविवारी दिवसभरात ४१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एकट्या कुरण गावात २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता गावाची चिंता वाढली आहे. तर १५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर : रविवारी दिवसभरात ४१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एकट्या कुरण गावात २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता गावाची चिंता वाढली आहे. तर १५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६१८  इतकी झाली आहे. रविवारी १७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयात या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याशिवाय आणखी १२ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामध्ये नवनागापूर येथील तीन, नगर शहरातील पद्मानगर भागातील दोन, नाईकवाडपुरा (संगमनेर) येथील एक, श्रीरामपूर येथील एक, भिंगारमधील गवळीवाड्यातील दोन, खेरडा (ता. पाथर्डी) येथील दोन, राहाता येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

रात्री २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामध्ये  कुरण गावातील २२ जण, शेवगाव तालुक्यातील निंबे नांदुर येथील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावचे पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  एका आमदाराच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असून दक्षता म्हणून त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 दुपारपर्यंत ११० आणि सायंकाळी ६५ जण अशा १७५ जणांचे अहवाल दिवसभरात निगेटिव्ह आले आहेत.रविवारी सकाळी १५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४०० इतकी झाली आहे. रविवारी सोडण्यात आलेल्या १५ जणांमध्ये नगर शहरातील ९, नगर तालुक्यातील चार, संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाला घरी सोडण्यात आले.