शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डमी बसविणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा

By admin | Updated: August 10, 2016 00:26 IST

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या तलाठीपदाच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी अनुरुध्द गव्हाणे

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या तलाठीपदाच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी अनुरुध्द गव्हाणे याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अनुरुध्द गव्हाणे याचा भाऊ गणेश गव्हाणे यानेच परीक्षा दिल्याचे तपासात उघड झाले आहे़जिल्हाप्रशासनाने तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ सप्टेंबर २०१५ मध्ये शहरातील विविध उपकेंद्रांवर लेखी परीक्षा घेतली़ सदर लेखी परीक्षेस खुल्या प्रवर्गातून आष्टी तालुक्यातील कारखेल येथील अनुरुध्द रामराव गव्हाणे याची तलाठी पदासाठी निवड करण्यात आली होती़ मात्र गव्हाणे याच्या निवडीबाबत प्रशासनाला तक्रार प्राप्त झाली़ या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अनुरुध्द गव्हाणे यांचे कागदपत्रे तपासली़ तपासादरम्यान त्याचा भाऊ गणेश याचे छायाचित्र आॅनलाईन अर्जावर अपलोड केल्याचे निदर्शनास आले़ तलाठी पदाची परीक्षा गव्हाणे यानेच दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला़ तलाठी अनुरुध्द याचा भाऊ गणेश येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात बी़ एस़ सी़ च्या तृतीय वर्षात शिकतो़ तसेच गणेश स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने त्याचा त्याला या परीक्षेला फायदा झाला़ परीक्षेत अनुरुध्द उत्तीर्ण झाला़ त्याची प्रशासनाने तलाठी पदासाठी निवडदेखील केली़ या घटनेला एक वर्षे उलटले़ एक वर्षे उलटल्यानंतर प्रशासनाने चौकशी करून अनुरुध्द विरोधात गुन्हा दाखल केला़ परीक्षेत डमी उमेदवार बसवून शासनाची फसवणूक केल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे़ डमी उमेदवार बसविल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़ परीक्षेच्या वेळी त्याचे ओळखपत्र तपासले होते का आणि तपासले असेल तर ही बाब संबंधिताच्या निदर्शनास का आली नाही, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़ चौकशीतून अनुरुध्द याचे पितळ उघडे पडले असून, याप्रकरणी तहसीलदार हेमा बडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.