शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे कर्ज वाढल्यामुळे शेतकऱ्याने संपविली मुळा नदीत जीवनयात्रा

By admin | Updated: April 8, 2017 18:32 IST

गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने घोरपडवाडी (ता़ राहुरी) येथील शेतकरी देवराम रखमा शेंडगे (वय ५५) यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठा वाढला.

आॅनलाईन लोकमतराहुरी (अहमदनगर), दि़ ८- गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने घोरपडवाडी (ता़ राहुरी) येथील शेतकरी देवराम रखमा शेंडगे (वय ५५) यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठा वाढला. त्यामुळे त्यांनी मुळा नदी पात्रातील डिग्रस बंधाऱ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली़ शनिवारी मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. घोरपडवाडी येथे शेंडगे यांना तीन एकर जमीन आहे़ त्यांनी दोन एकर क्षेत्रावर पुन्हा कांदा पीक घेतले़ मात्र सोसायटी कर्ज व अन्य हात उसने घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले़ कर्जाचा डोंगर वाढल्याने गेल्या काही दिवासांपासून शेंडगे अस्वस्थ होते़ नातेवाईकांकडून पैसे घेऊन येतो, असे घरी सांगून देवराम शेंडगे हे बाहेर गावी गेले़ गेल्या तीन दिवसांपासून नातेवाईकांकडे शोध सुरू होता़ शनिवारी डिग्रस बंधाऱ्यामध्ये प्रेत आढळल्याचे नातेवाईकांना समजले़ त्यानंतर दुपारी चिरफाड बंगल्यामध्ये असलेला मृतदेह नातेवाईकांनी ओळखला़डिग्रसचे पोलीस पाटील रावसाहेब पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात माहिती दिली़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँस्टेबल मोकाटे करीत आहेत़ मयत शेंडगे यांच्यामागे पत्नी,दोन मुले असा परिवार आहे़ राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़मुळा नदी पात्रात विवस्त्रावस्थेत ५५ वर्षीय पुरुषाचे प्रेत आढळले़ त्याच्या छातीवर जखमा आढळून आल्या़ २० फुटावरून उडी मारल्यास किंवा अन्य कारणाने जखम होऊ शकते़ पोलीस तपासात पुढील माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुधीर क्षीरसागर यांनी सांगितले़दर कोसळल्याने आर्थिक फटकानोटाबंदी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राहुरी तालुक्यातील बागायती भागालाही जोरदार आर्थिक फटका बसला आहे़ शेतकऱ्यांंवर मोठ्या प्रमाणात सहकारी सोसायट्या, बँका, सावकार व नातेवाईक यांचे कर्ज वाढले आहे़ कांद्याला सरासरी चार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे़