शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ‘हे परिसर’ झाले कंटेन्मेंट झोन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:02 IST

अहमदनगर : कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने संगमनेर शहरातील काही भाग, राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे, तर नगर शहरातील सथ्था कॉलनी परिसर कंटेन्मेंट झोन व त्याच्या लगतचा भाग बफर झोन म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केला आहे.

अहमदनगर : कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने संगमनेर शहरातील काही भाग, राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे, तर नगर शहरातील सथ्था कॉलनी परिसर कंटेन्मेंट झोन व त्याच्या लगतचा भाग बफर झोन म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवेसह इतर सर्वच वस्तू विक्री, दुकाने या भागात १२ जूनपर्यंत बंद ठेवावेत, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत.संगमनेर शहरात शनिवारी पाचजण कोरोनाबाधित रूग्ण आढळले. याशिवाय शुक्रवारी राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे येथे एका भाजीविक्रेत्या महिलेला कोरोना झाल्यानंतर तिच्या संपर्कातील तिच्याच कुटुंबात सहाजण बाधित आढळले. शनिवारी नगर शहरातील सथ्था कॉलनीतील ५ जण पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रूग्ण ज्या भागात आढळले त्या भागात कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री व इतर सर्व दुकाने बंद राहतील. येथे प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जाईल. कंटेन्मेंट झोनच्या लगतचा भाग बफर झोन म्हणून घोषित केला असून तेथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहणार आहेत.--------------------------१) संगमनेर कंटेन्मेंट झोन : भारतनगर, रहिमतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्ती.बफर झोन :  जुना जोर्वे रोेड, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती.

२) निमगाव कोºहाळे कंटेन्मेंट झोन : अण्णाभाऊ साठेनगर, क्रांती चौक, वेसजवळील गावठाण, आंबेडकर स्मारक जवळील वस्ती, एकलव्य नगर, इंदिरा वसाहत, कातोरो वस्ती, साईनाथ हौंसिग सोसायटी, चांगदेवनगर, सुलाखेनगर, यमुुनानगर, विजयानगर, देशमुख चारीखालील भाग, रेस्टहाऊस रोडपासून उत्तर बाजू.बफर झोन : निघोज गावठाण सर्व. 

३)सथ्था कॉलनी, नगरकंटेन्मेंट झोन : स्टेशन रोड, सिद्धेश मोटर्स, जुने कैलास हॉटेल, डॉ. खालकर हॉस्पिटल, कोठी रोड, हेमराज केटरर्स, मारूती मंदिर, पुंड यांचे घर, कृषी उत्पन्न बाजार समितीची पूर्वेकडील भिंत ते स्टेशन रोड.बफर झोन : भुसार बाजार आवार, तुळजाभवानी मंदिर, पांजरपोळ संस्थेचे गाळे, वायएमसीए संस्थेचे मैदान, कोठी रोड पूर्व बाजू, अरिहंत सोसायटी, पूनम मोतीनगर.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या