शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पर्जन्यमान चांगले असल्याने यंदाचा खरीप जोमात- कृषी अधिकारी सुनीलकुमार राठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:36 IST

अहमदनगर : यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरिपाची पिके शेतकºयांना साधणार आहेत. शेतकºयांनी पुरेशी ओल असल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यांचा पुरवठा मुबलक आहे. खताच्या पुरवठ्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही अडचणी होत्या. परंतु आता खतांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरिपाची पिके शेतकºयांना साधणार आहेत. शेतकºयांनी पुरेशी ओल असल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यांचा पुरवठा मुबलक आहे. खताच्या पुरवठ्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही अडचणी होत्या. परंतु आता खतांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे. त्यामुळे शेतकºयांना बियाणे, खतांचा तुटवडा जाणवणार नाही. परिणामी यंदा खरिपाचे उत्पादन नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी ‘लोकमत’ संवादादरम्यान व्यक्त केला. 

- यंदाच्या खरिपाची स्थिती कशी राहील?राज्यात यंदा चांगला पाऊस आहे. त्यातही नगर जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खरिपाचे पेरणी क्षेत्र नक्कीच वाढेल. शेतकºयांनी जमिनीत चांगली ओल असल्याची खात्री करूनच पेरणी करावी. ओल कमी असेल तर बियाणे खराब होऊन उगवण व्यवस्थित होत नाही. यंदा खरीप पिकांचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे साडेचार लाख आहे. त्यापैकी आतापर्यंत २५ टक्क््यापर्यंत पेरणी झालेली आहे. त्यात झपाट्याने वाढ होत आहे. 

- शेतकºयांनी कोणत्या पिकांना प्राधान्य द्यावे?भौगोलिक स्थितीनुसार पीक पद्धती बदलतात. जिल्ह्यात दक्षिण भागात खरिपाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने मूग, उडीद पिकांची पेरणी वेळेवर झाली. त्यामुळे ही पिके वेळेवर निघून जमीन पुन्हा रब्बीसाठी मोकळी होईल. याशिवाय यंदा बाजरी, सोयाबीन, कपाशीचे क्षेत्रही मोठे आहे. 

- बियाणे, खतांची उपलब्धता कशी आहे?खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के बियाणे व ५१ टक्के खतांचा पुरवठा झाला आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आला. परंतु आता तो पूर्ववत होत आहे. शासनाकडे ५७ हजार ७०० क्विंटल बियाणे व २ लाख ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवली होती. १५ जूनपर्यंत यातील ४० हजार क्विंटल म्हणजे ७० टक्के बियाणे उपलब्ध झाले असून १ लाख ४० हजार मेट्रिक टन (५१ टक्के) खतांची उपलब्धता झाली आहे.  प्रस्तावित क्षेत्रापैकी सर्वाधिक १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाजरीचे असून त्याखालोखाल १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. याशिवाय ७९ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर ७५ हजार हेक्टरवर मका पेरणीचेही नियोजन आहे. 

- कोरोना स्थितीचा शेतकरी, शेतीवर काही परिणाम?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शासनाने कृषी व कृषीसंलग्न सेवांना मुभा दिली होती. त्यामुळे फारशा अडचणी आल्या नाहीत. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतकºयांना बियाणे, खते खरेदीसाठी येता येत आहे. बियाणे व खतांची वाहतुकही होत आहे. त्यामुळे कोरोना किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा परिणाम शेतीवर झालेला दिसत नाही. ------------ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर