शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा : विकतच्या पाण्यावर जगते संपूर्ण गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:45 IST

तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत.

मुन्ना पठाण कर्जत : तालुक्यातील काही गावात यंदा पाऊस न झाल्याने पिके वाया गेली आहेत. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे टँकरची मागणी वाढू लागल्याचे चित्र आहे. तर काही गावात विकत पाणी घेण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ अधिक गडद होताना दिसत आहे.कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात या गावात पाणी योजनेचे तिन्ही उद्भव कोरडे पडल्याने गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांना एक बॅरल २०० लिटर पाण्यासाठी ७० ते ८० रूपये मोजावे लागत आहे. शाश्वत पाणी पुरवठा योजना नसल्याने गावासमोर पुढच्या काळात पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे.या गावाची लोकसंख्या साधारण २२५० च्या जवळपास आहे. या गावाला पूर्वी दोन विहिरींद्वारे पाणी पुरवठा होता. परंतु काळानुरूप दोन्ही उद्भव कोरडे पडल्याने काही महिन्यांपूर्वी नवीन विहीर घेण्यात आली.पाणी लागल्याने पाणी पुरवठाही सुरू झाला. परंतु त्या विहिरीची पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यातूनच आता या संपूर्ण गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. खासगी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतात नापिकी व गावात पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाला टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. भविष्यात तुकाई चारी किंवा सिंचन योजनेच्या माध्यमातून गावाजवळील तलावात कुकडीचे पाणी सोडल्यास गावाच्या पाणी योजनेचा मोठा प्रश्न सुटेल. यासाठी भविष्यात तुकाई चारी प्रकल्प मार्गी लागण्याची गरज आहे.गावाच्या पाणी योजनेच्या जुन्या दोन व नवीन एक विहीर आटल्याने सध्या गावात पाणी टंचाई असल्याने २०० लिटर पाण्यासाठी ७० ते८० रूपये मोजावे लागत आहेत. -परशुराम हरी काळदाते, ग्रामस्थ, चिंचोली काळदात.पाणी टंचाईमुळे टँकरचा प्रस्ताव दाखल केला आहे. पाणी योजनेच्या विहिरीला आडवे बोअर घेऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - रघुआबा काळदाते, उपसरपंच, चिंचोली काळदात

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर