शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारुमुळे एकाचा मृत्यू

By admin | Updated: March 1, 2017 18:47 IST

तरवडी येथील एकजण बनावट दारुमुळे मृत्यू पावला असून, एक जणाची प्रकृती अत्यवस्थ आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

ऑनलाइन लोकमतनेवासा (अहमदनगर), दि. 01 -  तरवडी येथील एकजण बनावट दारुमुळे मृत्यू पावला असून, एक जणाची प्रकृती अत्यवस्थ आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दारु विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विक्रेताही दारु पिल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनीही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.नगर तालुक्यातील पांगरमल येथील दारुकांडानंतर नेवासा येथेही बनावट दारुचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, तरवडी येथील बिबनभाई सय्यद यांचा नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच तरवडीतील नसीर इस्माईल सय्यद (वय ३६) यांना दारु पिल्यामुळे त्रास होऊ लागला. त्यांनी घरी आणून दारुचे सेवन केले होते. मात्र, काही वेळातच त्याची तब्येत बिघडत चालल्याचे पाहून त्याच्या नातेवाईकांनी त्वरीत हालचाल करत उपचारासाठी विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या रुग्णालयात दाखल केले. ही दारु बनावट असल्यानेच नसीर सय्यद याची प्रकृती बिघडल्याचा आरोप करत कदीर चाँदखाँ पठाण (वय-३६) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात दारुविक्रेत्याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. बनावट दारुचा गुन्हा दाखल होताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन घटनेचा तपास सुरु केला. तरवडी गावातील किराणा दुकानातून अवैधरित्या दारु विकणाऱ्याची माहिती पोलिसांना समजताच त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली करण्यात आली़ आपणच ही दारु विकली असून स्वत:ही प्राशन केल्याचे त्याने कबूल केले. विक्रेता स्वत: तिच दारु पिल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यालाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या विक्रेत्याच्या विविध वैद्यकिय चाचण्या करण्यात येत असून दवाखान्यातून अहवाल आल्यानंतरच पुढील निष्कर्ष काढता येतील, असे पोलिसांनी सांगितले़