शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारू खरेदीसाठी दुकानांसमोर मद्यप्रेमींची झुंबड, पहाटेपासून लांबच लांब रांगा: फिजिकल डिस्टन्सिगला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:16 IST

अहमदनगर : प्रशासनाने जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्याने मंगळवारी (दि.5) पहाटेपासूनच जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती. ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दारू खरेदीसाठी आतुर झालेल्या ग्राहकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना  पहिल्याच दिवशी हरताळ फासला.

अहमदनगर : प्रशासनाने जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्याने मंगळवारी (दि.5) पहाटेपासूनच जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती. ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दारू खरेदीसाठी आतुर झालेल्या ग्राहकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना  पहिल्याच दिवशी हरताळ फासला.

दोन ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर व एका दारू दुकानासमोर पाच ग्राहकांनापेक्षा जास्त जण उभा नको हा नियम कुठल्याच दारू दुकानासमोर पाळला गेलेला दिसला नाही. मंगळवारी सकाळी सकाळी दहा वाजता दुकानांमधून दारु विक्रीला सुरुवात झाली. मध्यप्रेमी मात्र पहाटेपासूनच दुकान उघडण्याची वाट पाहत होते.जिल्हा प्रशासनाने 5 एप्रिल पासून जिल्ह्यातील मद्य विक्री दुकानांना परवानगी दिल्याचे सोमवारी रात्री जाहीर केले. अवघ्या काही मिनिटातच सोशल मीडियावर ही बातमी सर्वत्र व्हायरल झाली. मंगळवारी दारूची दुकाने उघडणार असल्याने अनेकांनी दारू खरेदीसाठी पहाटेपासूनच दुकानासमोर रांग लावली होती.   कंटेनमेंट झोन, शहरातील बाजारपेठा, मॉल व गर्दीची  ठिकाणे वगळता  इतर सर्व ठिकाणी ही दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत  सुरू राहणार आहेत.  मद्य  विक्रीची दुकाने सुरू असताना काही अटी व शर्ती प्रशासनाने घालून दिल्या  आहेत. त्यामध्ये दुकानासमोर पाच पेक्षा जास्त ग्राहकांनी उभे राहू नये,  दोन ग्राहकांमध्ये सहा फुटांपेक्षा जास्त अंतर हवे. प्रत्यक्षात मात्र दारूच्या दुकानांसमोर अनेक ठिकाणी मोठी झुंबड उडालेली दिसली, सहा फुटाच्या अंतराचा नियमही कुणी पाळला नाही. त्यामुळे दारू विक्री दरम्यान पहिल्याच दिवशी ग्राहकांनी नियमांना हरताळ फासला.