शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे ढग : २३ दिवस खेटा मारूनही मिळेना टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:11 IST

नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आतापासुनच काही गावांमध्ये पाण्याची टंचाई वाढु लागली आहे. उक्कडगावमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने टँकरमंजुरीसाठी प्रस्ताव दिला.

ठळक मुद्देनगर तालुक्यातील उक्कडगावमध्ये आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष, टँकरसाठी हेलपाटे

योगेश गुंडकेडगाव : नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आतापासुनच काही गावांमध्ये पाण्याची टंचाई वाढु लागली आहे. उक्कडगावमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने टँकरमंजुरीसाठी प्रस्ताव दिला. प्रस्ताव मंजुर झाला. पण सतत २३ दिवस खेटा मारूनही उत्तर मिळाले ‘टँकरच शिल्लक नाही’ टँकरसाठी इतक्या चकरा मारूनही पदरी निराशा पडल्याने येणारा काळ पाण्यावीना किती भयान असणार या चिंतेत आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस पडला आहे.नगर तालुक्यात पावसाने ५ टक्के सरासरीचा ही टप्पा गाठला नाही. परतीच्या पावसाकडे डोळे लाऊनही पदरी काहीच पडले नाही. काही गावांमध्ये विहीरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु लागली आहे. सध्या नगर तालुक्यात दोन गावात टँकर सुरु आहेत. उक्कडगाव येथे ही गावातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन सरपंच नवनाथ म्हस्के यांनी गावाला टँकर मिळावा यासाठी प्रस्ताव तयार केला.टँकर चालू करण्यासाठी सरपंच म्हस्के यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे टँकरसाठी १५ सप्टेंबरला प्रस्ताव सादर केला. १७ सप्टेबर तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी दिला. २५ सप्टेबरला प्रांत विभाग टंचाई शाखा उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला २१ दिवसांनी ६ आक्टोबरला मंजुरी दिली. या बाबतचे पत्र टंचाई विभागाने पंचायत समितीला टँकर चालु करण्याबाबत दिले. हे पत्र त्यांना ८ आॅक्टोबरला मिळाले. मात्र पाणी पुरवठा विभागाचे राम नाटे यांनी टँॅकरच शिल्लक नसल्याचे सांगीतले. टँकर पुरविण्याचा ठेका श्री गणेश सहकारी मोटार वाहतुक संस्था मर्या शेवगाव यांच्याकडे आहे. टँकर मंजुरीसाठी २३ दिवस पंचायत समिती तहसील, प्रांत कार्यालयात चकरा मारल्या. प्रांत विभाग टंचाई शाखेमधून अरेरावी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असे म्हस्के यांनी सांगीतले.गावाची पाणी टंचाई लक्षात घेऊन टँकर मागणीचा प्रस्ताव दिला. त्यासाठी रोज सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. पण प्रशासनाकडे टँकरच शिल्लक नसल्याचे उत्तर मिळाले. आता गावाचा पाणीप्रश्न कसा सोडवायचा हा आमच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. - नवनाथ म्हस्के, सरपंच, उक्कडगाव

उक्कडगावचा प्रस्ताव तहसील कार्यालयास प्राप्त झाला. आम्ही त्यास मंजुरी दिली आहे. तो पुढील कार्यवाहीसाठी टंचाईशाखेकडे पाठवला आहे. मात्र टँकर देण्यात काय अडचण आली ते आम्हाला सांगता येणार नाही. - आपासाहेब शिंद, तहसिलदार, नगर तालुका

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय