शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास

By सुदाम देशमुख | Updated: February 26, 2025 10:49 IST

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

घारगाव (जि. अहिल्यानगर): शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा बनाव ट्रक चालकानेच केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संबंधित चालकाने आळेफाटा (जि. पुणे) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्यात हद्दीतील असल्याने गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी तपास केला असता फिर्यादी ट्रकचालक यातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले असून त्यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दीपक किसन कदम (वय : ४२, रा. राजगुरूनगर वाडा, ता. खेड. जि. पुणे) असे ट्रक चालकाचे तर तेजस प्रकाश कहाणे (वय : २१, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे), साईदास रघुनाथ गाडेकर (वय : २७, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. निमगाव निघोज, ता. राहाता. जि. अहिल्यानगर) आणि नवनाथ दादाभाऊ शिंदे (वय : २८, रा. रोहकल, चाकण, ता. खेड. जि. पुणे) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. त्यांनी मिळून ५ लाख ७२ हजार २१४ रुपये किंमतीची शेतीची औषधे लंपास केली होती. ही घटना ३१ जोनवारीला पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर माहुली घाटात घडली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांसह पोलिस हेड कॉन्स्टेबल एकनाथ खाडे, पोलिस कॉन्स्टेबल चांगदेव नेहे तपासाची चक्रे फिरवली. वरील चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे हे करीत आहेत.असा रचला ‘त्यांनी’ बनाव

ट्रकचालक दीपक कदम हा शेतीची औषधे भरलेली ट्रक घेऊन पुण्याहून नाशिकला जात होता. चाळकवाडी टोलनाका येथून त्याने दोन प्रवासी बसविले, ही ट्रक माहुली घाटात आली असता त्यातील एका प्रवाशाला बाथरूमला लागल्याने त्याने गाडी थांबवली. त्यावेळी ट्रकमधील दुसऱ्या व्यक्तीने कदम याच्या डोक्याला गावठी कट्टा लावला. त्यावेळी दुसरा व्यक्ती ड्रायव्हर बाजूने ट्रकमध्ये चढला. त्याने कदम याच्या नाकाला रूमाल लावला अन् तो बेशुद्ध झाला. सकाळी ७.३० वाजता शुद्धीवर आल्यानंतर गाडीत औषधी नव्हती. असा बनाव ट्रकचालक कदम आणि त्याच्या साथीदारांनी रचला होता. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.