शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धरणात कार बुडाल्याने चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

शनिवारी रात्री पुणे येथील एमटीयू कंपनीचे मालक गुरू सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर राजूरकर, चालक सतीश घुले (वय ...

शनिवारी रात्री पुणे येथील एमटीयू कंपनीचे मालक गुरू सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर राजूरकर, चालक सतीश घुले (वय ३५, औरंगाबाद) हे कारने कळसूबाईकडे निघाले होते. मात्र, कोतुळात आल्यावर गुगल मॅपवर कोतूळ-राजूर-कळसुबाई असा राज्यमार्गाचा रस्ता असताना गुगल मॅपवर कोतूळ ते अकोले असे दाखवल्याप्रमाणे पर्यटक रात्री पावणेदोन वाजता कोतूळ पुलाच्या रस्त्याने निघाले. पावसाने रस्ता ओला असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात समोर पूल पाण्याखाली असल्याचा कोणताही फलक अथवा गुगलवर पूल पाण्याखाली असल्याची सूचना नसल्याने ते सरळ पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात गेले. कार बुडू लागताच तिघेही खिडक्यांतून बाहेर आले. समीर राजूरकर व गुरू शेखर यांना पोहता येत असल्याने ते कडेला आले. पोहता येत नसल्याने सतीश घुले पाण्यात बुडाला. अचानक अपरात्री आरडाओरडा झाल्याने जवळच असलेल्या पेविंग ब्लॉक कंपनीचे कामगार जागे झाले. त्यांनी मालक बाळासाहेब घाटकर, संतोष देशमुख, अरविंद देशमुख यांना कळविले. कोतूळ पोलीस स्टेशनचे सुनील साळवे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोहणारे घुले यांचा शोध घेत आहेत. संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, अकोलेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे घटनास्थळी दाखल झाले आहेत.