शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची दारू प्या.. तर आमचा चखना खा..! नगरमध्ये अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:09 IST

शासनाने दारू विक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचाच्यावतीने शुक्रवारी (दि.८) शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. दारू खरेदीसाठी दुकानांसमोर रांगेत उभे असलेल्या मद्यप्रेमींना आंदोलकांनी चखण्याच्या पुड्या वाटून सरकारी निर्णयाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. हे आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरले.

अहमदनगर : शासनाने दारू विक्रीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचाच्यावतीने शुक्रवारी (दि.८) शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. दारू खरेदीसाठी दुकानांसमोर रांगेत उभे असलेल्या मद्यप्रेमींना आंदोलकांनी चखण्याच्या पुड्या वाटून सरकारी निर्णयाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. हे आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरले.मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आले. मुळे म्हणाले, गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून सर्वसामान्य गोरगरीब जनता लॉकडाऊनमुळे घरात बसून काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन करत आहे. अशा परिस्थितीत सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. दारू जर जीवनावश्यक वस्तू आहे तर दारू घेणा-यांसाठी चखनाही महत्वाचा आहे. म्हणून जागरूक नागरिक मंचच्यावतीने राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पोषक आहार म्हणून कोरोना स्पेशल चखण्याची पाकिटे दारू घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांना देऊन आंदोलन केले आहे. जो पर्यंत राज्य सरकार हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू असणार असल्याचे मुळे यांनी सांगितले. या आंदोलनात जागरूक नागरिक मंचचे कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, योगेश गणगले, हरिभाऊ डोळसे, सुनील कुलकर्णी, राजू पडोळे, बी. यु़ कुलकर्णी, अमेय मुळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या