शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तपकीर ओढा; कोरोना टाळा, भाजप नेते राजेंद्र नागवडे यांचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:16 IST

श्रीगोंदा : तपकीरीला उग्र वास असतो. त्यामुळे कोरोनाचा विषाणूही तेथे राहू शकत नाही. कोरोनाच्या लागण झालेल्या रूग्णांना या तपकिरीचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो का? याचा अभ्यास तज्ज्ञांनी करावा, असा सल्ला नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप नेते राजेंद्र नागवडे यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : तपकीरीला उग्र वास असतो. त्यामुळे कोरोनाचा विषाणूही तेथे राहू शकत नाही. कोरोनाच्या लागण झालेल्या रूग्णांना या तपकिरीचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो का? याचा अभ्यास तज्ज्ञांनी करावा, असा सल्ला नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप नेते राजेंद्र नागवडे यांनी दिला आहे.भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी तंबाखू खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, केवळ तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही,असा अजब दावा करून खळबळ माजवून दिली होती. अशाच प्रकारचा तपकीर ओढल्याने कोरोनापासून दूर राहता येते, असा अजब दावा नागवडे यांनी केला आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध आले नाही. जगातील शास्त्रज्ज्ञ चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर नागवडे यांचा हा व्हीडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.राजेंद्र नागवडे यांनी स्वत:चा एक व्हीडिओ तयार करून सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यात नागवडे म्हणतात, जुन्या काळात तपकीर ओढली जायची. तपकिरीला उग्र वास असतो. त्यामुळे कोणताही विषाणू, जंतू त्यापुढे टिकाव धरू शकत नाही. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची चर्चा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर तपकिरीचा प्रयोग करून पहावा. कदाचित यामुळे या रोगाला आळा बसू शकतो. असा दावा नागवडे यांनी केले आहे.--काय असते तपकीरतपकीर किंवा नस म्हणजे तंबाखूच्या वाळलेल्या पानांची भूकटी. तपकीर ओढणे हे एक प्रकारचे व्यसन आहे. १७ व्या शतकांत तपकीर ओढण्याचे व्यसन इंग्लंडमध्ये सुरू झाले. नंतरच्या काळात ते कमी होत आता बहुतेक नामशेष होत आले आहे. श्रीमंत घराण्यातही सोन्या-चांदीच्या डबीत तपकीर ठेवली जायची.