लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंजुरी द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्री संजय बनसोडे हे नुकतेच नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात किरण दाभाडे, पप्पू पाटील, विजय भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, संजय दिवटे आदींचा समावेश होता. सुरेश बनसोडे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्व समाज प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मागास समाजाला प्रवाहात आणण्याचे काम राज्यघटनेमुळे शक्य झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळेल. तसेच समाजकार्याची शिकवण मिळेल. त्यासाठी शहरामध्ये भव्यदिव्य असा पुतळा उभारावा, ही सर्व नगरकरांची इच्छा आहे, असे सुरेश बनसोडे म्हणाले.
..
सूचना फोटो आहे.