अहमदनगर: हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्णात सामाजिक क्षेत्रातील ५ पेक्षा जास्त नाहीत, अशा व्यक्तींचा समावेश असलेले सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ या समितीत सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश करण्यात येणार असून, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी येत्या ५ आॅगस्टपर्यंत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अॅड़ संजय जव्हेरी यांनी केली आहे़ अर्ज करणारी व्यक्तीचे वय ३५ पेक्षा अधिक नसावे, तसेच अर्ज करणारी व्यक्ती जिल्ह्यातील रहिवासी असावा याशिवाय महिलांच्या संबंधितील कायदे यांचा विकास व पुनर्वसन याबाबतचे ज्ञान किंवा या क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल, असेही कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
हुंडा प्रतिबंधक समिती स्थापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 00:32 IST