शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमवर शंका : ९ मतदारसंघाच्या वोटिंग-काऊंटिंगमध्ये तफावत;  संगमनेर, शिर्डी, नेवाशात आकडेवाडी तंतोतंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:44 IST

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी ९ मतदारसंघात प्रत्यक्ष झालेले मतदान व मतमोजणीनंतर समोर आलेली मतांची आकडेवारी यात तफावत आढळत आहे. केवळ संगमनेर, शिर्डी, नेवासा या तीनच मतदारसंघात ही आकडेवारी जुळते.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी ९ मतदारसंघात प्रत्यक्ष झालेले मतदान व मतमोजणीनंतर समोर आलेली मतांची आकडेवारी यात तफावत आढळत आहे. केवळ संगमनेर, शिर्डी, नेवासा या तीनच मतदारसंघात ही आकडेवारी जुळते . त्यामुळे इतर ठिकाणी ईव्हीएमवर शंका उपस्थित होत आहेत. राज्यातील बºयाच ठिकाणी ईव्हीएममधील मतांमध्ये तफावत आढळून आली आहे. राज्यातील ११४ मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीत कमी मते आढळली आहेत.  तर मतदानापेक्षा मतमोजणीत जास्त मते आढळलेली ५९ मतदारसंघ आहेत. ११५ ठिकाणी ही आकडेवाडी जुळलेली आहे. त्यात नगर जिल्ह्याचाही समावेश आहे. नगरमधील संगमनेर, शिर्डी, नेवासा या ३ मतदारसंघात ही आकडेवारी तंतोतंत बरोबर आहे. तर अकोले, कोपरगाव , श्रीरामपूर, शेवगाव व पारनेर या ५ मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीतील मतांची संख्या जास्त आहे. राहुरी, नगर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड या ४ मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीतील मतांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात सरासरी ६९.४३ टक्के मतदान झाले. एकूण २४ लाख ११ हजार ६८१ मतदारांनी  ईव्हीएमवर प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. परंतु जेव्हा २४ आॅक्टोबर रोजी ईव्हीएममधील मतांची मोजणी झाली तेव्हा मतांच्या आकड्यांत तफावत आढळली. त्यामुळे ईव्हीएमवर अनेकांकडून शंका उपस्थित होत आहेत. निवडणूक शाखेत याबाबत विचारणा केली असता अद्याप आमच्याकडे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून अंतिम आकडेवारी आली नसल्याचे सांगितले जात आहे.  नगर उपजिल्हा निवडणूक अधिका-यांच्या सहीने जाहीर झालेली अंतिम मतदानाची आकडेवारी व मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर  उपलब्ध असलेली मतांची आकडेवारी गृहित धरून ही तफावत आढळत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग