शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांचा इष्टांक व मानधनाच्या रकमेत दुपटीने वाढ करावी; जिल्हा परिषदेत निवेदन

By चंद्रकांत शेळके | Updated: August 25, 2023 19:10 IST

वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन निवड समितीचा ठराव

अहमदनगर : वृध्द, साहित्यिक व कलाकार मानधन योजनेच्या इष्टांकात व कलावंतांच्या मानधनात दुपटीने वाढ करावी, असा ठराव वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीच्या बैठकीत करण्यात आला.

शुक्रवारी (दि. २५) जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन निवड समितीचे अध्यक्ष ह.भ.प. नानासाहेब गागरे, सदस्या लावणी सम्राज्ञी राजश्री नगरकर, सदस्य शाहीर निजामभाई शेख, शाहीर विजय तनपुरे व ह.भ.प. महादेव महाराज झेंडे उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. जिल्ह्यात तमाशा, लावणी, शाहिरी, कलगीतुरा, वासुदेव, पिंगळा, गोंधळ, जागरण, नंदीवाले, बहुरूपी, रायरंद, तंतू वाद्य वादक, चर्म वाद्य वादक, नाटक, संगीत, गायन, भारुड, गवळण अशा अनेक लोककला व लोक कलावंत आहेत. त्याचबरोबर अकोले, संगमनेर तालुक्यांमध्ये आदिवासींचे कांबड नृत्य, फुगडी नृत्य, गौरी नृत्य, होळी नृत्य, बोहाडा नृत्य अशा कला प्रकारांचा व कलावंतांचाही विचार व्हावा. सध्या दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील फक्त १०० कलावंतांनाच या योजनेचा लाभ देण्यात येतो. यात अनेकजण वंचित राहतात. त्यामुळे हा इष्टांक १०० वरून २०० करावा, तसेच सध्या अ, ब, व क वर्गातील कलावंतांना मिळत असलेल्या मानधनाच्या रकमेत दुपटीने वाढ करावी, अशी मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला. या मागणीचे निवेदन जिल्हा निवड समिती, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक मंत्री यांना पाठविणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी सांगितले. 

अशी होणार प्रस्तावांची पडताळणी या बैठकीत तालुकानिहाय कलावंतांच्या प्रस्तावाची पडताळणी करण्याची जबाबदारी तालुकानिहाय देण्यात आली. शेवगाव, पाथर्डी व नेवासा - नानासाहेब गागरे, राहुरी, श्रीरामपूर - शाहीर विजय तनपुरे, श्रीगोंदा, कर्जत - ह.भ.प. महादेव महाराज झेंडे, पारनेर व जामखेड - निजामभाई शेख, नगर शहर व तालुका - लावणी सम्राज्ञी राजश्री काळे, अकोला, कोपरगाव - विजय गायकवाड, राहाता, संगमनेर - नवनाथ महाराज म्हस्के हे पडताळणी करणार आहेत.