अहमदनगर : पेट्रोल, डिझेल, गोडतेल, गॅस पाठोपाठ आता मसाल्याच्या पदार्थांमध्ये ही वाढ झाली आहे. नागरिक महागाईने हैराण असताना या दरवाढीने स्वयंपाकाची चवही बेचव झाली आहे. मसाल्याच्या दरवाढीने गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे.
स्वयंपाक घरातील सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. जिरे, धने, मोहरी, बदामफूल, रामपत्री, खसखस, नाकेश्वर, मिरची, हळदीच्या दरामध्येही वाढ झाली आहे. जायफळ, दालचिनी, दगडफुलाच्या किमती सध्या स्थिर आहेत.
---
मसाल्याचे दर (रुपये प्रति १० ग्राॅममध्ये)
मसाले जुने दर नवे दर
रामपत्री १२ १४
बदामफूल ८ २०
जिरे १० १० (५० ग्राॅम)
काळीमिरी १० १०
नाकेश्वरी १० ३०
लवंग १० १०
तमालपत्री १० १०
दगडफूल ३५ ३५
------------------