शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमी अभिलेख’ची दारे बंद

By admin | Updated: May 18, 2017 18:34 IST

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सरकारी कार्यालयातील सेवेची हमी जनतेला देण्यात आली.

आॅनलाईन लोकमतमिलिंदकुमार साळवे / अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सरकारी कार्यालयातील सेवेची हमी जनतेला देण्यात आली. पण याच अधिनियमानुसार मात्र राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील सेवेची हमी गमावण्याची नामुष्की जनतेवर आली आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत या कार्यालयांमध्ये थेट कोणताही कागद घेऊन जाणाऱ्या जनतेला या अधिनियमाने या कार्यालयाची दारेच बंद केली आहेत.१ मे पासून अहमदनगर जिल्ह्यातील उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १ मे पासून भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये पूर्वीप्रमाणे थेट अर्ज व इतर कागदपत्रे नागरिकांना देता येत नाहीत. त्याऐवजी हे अर्ज व कागदपत्रे ‘आॅनलाईन’ देण्यास सांगण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणे नागरिक उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेखच्या कार्यालयांमध्ये अर्ज घेऊन गेल्यास त्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. असे अर्ज घेऊन येणारांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी माघारी पाठविले जात आहेत. त्यामुळे दूरच्या ग्रामीण भागातून या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच पैशासोबतच वेळसुद्धा वाया जात आहे. कार्यालयांमध्ये पूर्वीसारखे ‘बायहँड’ अर्जच स्वीकारले जात नसल्याने अघोषितपणे सर्वसामान्य जनतेस या कार्यालयांचे दारे लोकसेवा हक्क अधिनियमामुळे बंद झाली आहेत. त्यामुळे इकडून तिकडे अन् तिकडून इकडे चकरा माराव्या लागत आहेत.                                                      महसुलावर परिणाम१ मे पासून भूमी अभिलेख कार्यालयांचे कामकाज लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ‘आॅनलाईन’ केले आहेत. त्यानुसार आमच्या विभागाशी संबंधित २३ प्रकारच्या सेवा निर्धारित करून दिलेल्या आहेत. कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष अर्ज न स्वीकारता आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, त्याचा पाठपुरावा, उत्तर देणे अशी सर्व प्रक्रिया आता आॅनलाईन सुरू आहे. पूर्वी आमच्या कार्यालयात दहा रुपयांचे मुद्रांक शुल्क तिकीट लावून अर्ज करता येत होता. आता त्यासाठी नागरिकांना सायबर कॅफे किंवा सेतूमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. त्यात त्यांचा वेळ व पैसाही पूर्वीपेक्षा जास्त खर्च होत आहे. पूर्वी जिल्ह्यात जमीन मोजणीचे पाचशे ते सहाशे अर्ज येत होते. गेल्या १५ दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात असे २० ते २५ अर्जच आले आहेत. त्यामुळे आॅनलाईनच्या बदलामुळे खात्याच्या महसुलावरदेखील परिणाम झाला आहे. या बदलाच्या सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रियांबाबत शिफारशी सरकारला कळविण्यात येणार आहेत, असे भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक महेश शिंदे यांनी सांगितले़