शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:53 IST

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

येत्या रविवारपासून शहरात आठ दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे.  त्याकरिता शुक्रवारी रिक्षाद्वारे व्यावसायीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी मात्र याधीच बंदला उघडपणे विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने आमदार कानडे यांची भूमिका जाणून घेतली.

आमदार कानडे म्हणाले, केंद्र सरकारने घाईघाईत केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली. विकासदर हा वजा चोवीसपर्यंत कोसळला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांची अर्थव्यवस्था मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन बंद करून सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. सरकारचा प्राधान्यक्रम हा गरीब माणसांचा मृत्यूदर कमी करण्याला आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ५० खाटांचे कोवीड केंद्र सुरू होत आहे.

नगरपालिकेने स्वच्छतेचे काम चोखपणे पार पाडावे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एसएमएस मंत्र दिला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची खबरदारी घ्यावी, नियमिपणे हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन कानडे यांनी केले.-----------कोरोनासोबत जगावे लागेलकोरोनासोबत जीवन जगण्यासाठी समाजाला प्रवृत्त करावे लागेल. समाज हे हळूहळू शिकत आहे. गरीबांचा गेलेला रोजगार पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. काँग्रेस पक्ष देशभर रोजगार दो हे आंदोलन करत आहे. या अभियानात आपण स्वत: सहभागी आहोत. त्यामुळे पक्ष गरिबांचा विचार प्राधान्यक्रमाने करत आहे, असे आमदार कानडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर