शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम छायाचित्रकाराला बोलावू नका, शिवसेनेच्या माजी आमदाराचा अजब फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:49 IST

महानगरपालिकेत छायाचित्र काढण्यासाठी गेलेले ‘लोकमत’चे छायाचित्रकार साजिद शेख यांना जातीधर्मवाचक शब्द वापरुन माजी आमदार अनिल राठोड यांनी छायाचित्र घेण्यास मज्जाव केला होता. राठोड यांच्या या वर्तनाबाबत पत्रकारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अहमदनगर प्रेस क्लबच्या सदस्यांनी निषेध केला आहे. 

अहमदनगर : मुस्लीम छायाचित्रकाराला फोटो काढण्यासाठी बोलावू नका, असा अजब फतवा शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी काढला आहे. त्यामुळे छायाचित्रकार, पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नगर शहरातील व्यापाºयांचे शिष्टमंडळ मंगळवारी (दि. ३०) दुपारी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले होते. साजिद शेख यांना ही माहिती समजल्यानंतर ते छायाचित्र घेण्यासाठी गेले. यावेळी  राठोड हे आपल्या समर्थकांसह तेथे आले. शिष्टमंडळासोबत आयुक्तांच्या दालनात जाण्यापूर्वी ‘तुम्ही कोणता छायाचित्रकार आणला आहे,’ अशी विचारणा त्यांनी व्यापाºयांना केली. यावेळी व्यापाºयांनी शेख येथे आलेले आहेत, असे सांगितले. यावर राठोड यांनी शेख यांना उद्देशून जातीधर्मवाचक उल्लेख करत छायाचित्रे काढण्यासाठी आपली माणसेच बोलवत चला, असा अजब सल्ला व्यापाºयांना दिला. त्यांच्या या वर्तनाचा व्यापाºयांनाही धक्का बसला. विरोध केल्याने शेख छायाचित्र न घेता परत आले.  ‘अहमदनगर प्रेस क्लब’ला ही बाब लिखित स्वरुपात कळविण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्र्शींनी दिला दुजोरा‘लोकमत’ने याबाबत राठोड यांना विचारणा केली असता ‘मी असे बोललो नसून तुमच्याकडे मी बोलल्याचा व्हीडिओ आहे का?’ असा पवित्रा त्यांनी घेतला. सोशल मीडियावर या घटनेचा निषेध सुरु होताच त्यांनी प्रेस क्लबकडे पत्र पाठवून आपण असे बोललोच नसल्याचा खुलासा केला आहे. 

दरम्यान, ‘लोकमत’ टीमने या घटनेची प्रत्यक्षदर्र्शींकडून माहिती घेतली असता राठोड यांनी जातीवाचक वक्तव्य करुन छायाचित्रकाराचा अवमान केल्याचा दुजोरा उपस्थितांनी दिला. कर्तव्यावर असणाºया छायाचित्रकाराला अशी वागणूक दिल्याने व्यापारीही हळहळले. --