शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवरील लष्करी अळीला घाबरू नका- प्रवीण भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:20 IST

मका पिकावर उपजीविका करणारी अमेरिकन लष्करी अळी कपाशी पिकावर आढळून आली. सुसरे (ता. पाथर्डी) येथे ही अळी प्रथमच कपाशीवर आढळली. शेजारी मकाचा प्लॉट असल्याने अळीचा प्रादुर्भाव झाला. योग्य खबरदारी घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. त्यामुळे शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी दिली.

संडे मुलाखत - गोरख देवकर।  

अहमदनगर : मका पिकावर उपजीविका करणारी अमेरिकन लष्करी अळी कपाशी पिकावर आढळून आली. सुसरे (ता. पाथर्डी) येथे ही अळी प्रथमच कपाशीवर आढळली. शेजारी मकाचा प्लॉट असल्याने अळीचा प्रादुर्भाव झाला. योग्य खबरदारी घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. त्यामुळे शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी दिली.प्रश्न : कपाशीवर लष्करी अळी आल्याचे कसे समजले?भोर : सुसरे (ता. पाथर्डी) येथे क्रॉप स्वॅप अंतर्गत कपाशीच्या प्लॉटला आमच्या कृषी सहायकाने भेट दिली. त्याला तेथे अळी आढळली. त्याने मला माहिती दिली. आम्ही स्पॉट व्हिजीट केली. तेथे वेगळी अळी आढळली. ती लष्करी अळी असावी, अशी शक्यता वाटल्याने याची माहिती राहुरी विद्यापीठातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड, किटक शास्त्रज्ञ डॉ. एन. के. भुते, डॉ. व्ही. चिन्नाबाबू नाईक आदींना दिली. त्यांनी सर्वांनी सुसरे येथे भेट दिली. त्यांनी पाहणी केली व कपाशीवर लष्करी अळी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी यावरील उपाययोजनांचीही माहिती दिली.प्रश्न : अळी मक्यावरून कपाशीवर आली कशी? भोर : बहुभक्षीय ही अळी ८० पिकांवर उपजीविका करते. कपाशीवर प्रथमच लष्करी अळी आढळली. सुसरे येथील शेतकºयाच्या कपाशीच्या प्लॉटच्या शेजारीच मक्याचा प्लॉट होता. मका हे लष्करीचे आवडते खाद्य आहे. त्या मक्यावर लष्करीचा प्रादुर्भाव होता. त्या मका पिकावर रोटाव्हेटर मारला होता. ती प्रादुर्भावग्रस्त मका व्यवस्थित नष्ट झाली नव्हती. त्यामुळे तेथील अळी शेजारील कपाशी पिकावर गेली. प्रश्न : अळीने कपाशीच्या कोणत्या भागावर हल्ला केला?भोर : लष्करी अळीने प्रथम कपाशीची फुले, बोंड्यावर हल्ला केला. त्याचे नुकसान केल्याचे आढळून आले. यावर उपाययोजना आहेत. योग्य मार्गदर्शन व खबरदारी घेतल्यास लष्करीचाही नि:पात शक्य आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.प्रश्न :अनेक गावात कपाशीवर अळी आढळत आहे का?भोर : काही भागात कपाशीवर लष्करी अळी आढळत आहे. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. शेतकºयांनी खबरदारी घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळता येईल.