शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरमधील राममंदिरातील दानपेटी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:13 IST

संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून सुमारे नऊ ते दहा हजार रूपयांची रोकड लांबविली.

संगमनेर : शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून सुमारे नऊ ते दहा हजार रूपयांची रोकड लांबविली. बुधवारी रात्री साडेदहा ते गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कमलाकर विश्वनाथ भालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरातील चंद्रशेखर चौकात हे प्राचीन श्रीराम मंदिर आहे. बुधवारी रात्री पूजा झाल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले. गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुजारी असलेले सतीश तांबे मंदिरात पूजेसाठी जात असता त्यांना हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या या मंदिराच्या छोट्या प्रवेशद्वाराचा कोंडा कापलेला दिसून आला. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता त्यांना तेथील दानपेटी फोडलेली दिसून आली. चोरी झाल्याचा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी याची माहिती चंद्रशेखर चौक परिसरातील कमलाकर भालेकर, सोमनाथ पराई व माजी नगरसेवक श्रीराम गणपुले यांना कळविली. या सर्वांनी लागलीच पोलीस ठाणे गाठत मंदिरात चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.मारूती मंदिराशेजारी असलेल्या या मंदिराच्या छोट्या प्रवेशद्वाराचा कोंडा चोरट्यांनी कटरच्या साह्याने कापून मंदिरात प्रवेश केला. नुकतेच श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सव हे शहरातील दोन मुख्य उत्सव पार पडले. या काळात भाविकांनी पेटीत अर्पण केलेले दान चोरट्यांनी लंपास केले. पोलीस हेडकॉन्स्टेबल ए .एस. वाघमारे तपास करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसSangamnerसंगमनेर