शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पाचपुतेंचा बंदोबस्त करणार

By admin | Updated: June 24, 2014 00:05 IST

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचा आमदार कोण होईल हे मला माहित नाही. परंतू श्रीगोंद्याचे वाळवंट करणारे आ. बबनराव पाचपुते यांचा विधानसभा निवडणूकीत बंदोबस्त करणार आहे,

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचा आमदार कोण होईल हे मला माहित नाही. परंतू श्रीगोंद्याचे वाळवंट करणारे आ. बबनराव पाचपुते यांचा विधानसभा निवडणूकीत बंदोबस्त करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष घन:श्याम शेलार यांनी दिला. सोमवारी (दि़२३) श्रीगोंदा येथे कुकडी, घोडचे आवर्तन, वीज व साकळाई प्रश्नावर आयोजित धरणे आंदोलन प्रसंगी शेलारांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवरुन पाचपुतेंवर टीका केली़ शेलार म्हणाले, २००९ ला पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्यासाठी मी राजीनामा दिला होता. आणि आता ‘कुकडी-घोड’च्या पाणी प्रश्नावरुन बाहेर पडलो आहे. मी २००९ च्या निवडणुकीत मदत केली नसती तर पाचपुते आमदार झाले नसते़ आणि आता हेच पाचपुते मला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतून बाहेर काढले असते, असा दम भरीत आहेत़ वीज प्रश्न सोडण्यासाठी कोट्यवधी रुपये आल्याचे सांगितले जाते. मात्र शेतकऱ्यांना रोहित्र बसविण्यासाठी पैसे मोजावे लागतात. घोड नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या काढून आवर्तन सोडावे अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहे़ तसेच पिंपळगाव जोगा व डिंबे धरणाातून पाणी सोडून कुकडीचे आवर्तन सोडावे़ अन्यथा ३० जूनला रास्तारोकोचा इशारा शेलारांनी दिला. यावेळी बाबासाहेब इथापे, हेमंत नलगे, रावसाहेब काकडे, अ‍ॅड. डी. डी. घोरपडे, संतोष रायकर यांची भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या विरोधात लढावेच लागेल राष्ट्रवादी पार्टीचे नेते अजित पवारांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे़ परंतू सध्या त्यांचीही कोडी झाली आहे. ना. दिलीप वळसे, आ. वल्लभ बेनके हे राष्ट्रवादीचे नेते कुकडीचे पाणी अडवितात. त्याच्या विरोधात लढाई करावी लागेल. ऊस जळतोय म्हणून मी राजीनामा दिला. पाचपुतेंनी आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? माझ्या राजीनाम्याची चुकीची चर्चा केल्यास रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदावरुन का काढले याचा गौप्यस्फोट करण्याचा इशारा शेलारांनी दिला़ आमचा माणूस मिळालाघन:शाम शेलार यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणून रावसाहेब काकडे यांनी धरणे आंदोलनाप्रसंगी पेढे वाटले. कोळगावचे राजेंद्र नलगे म्हणाले, आमचा माणूस आम्हाला मिळाला आहे़ घोटवीचे सरपंच जालिंदर निंभोरे म्हणाले, तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांची कामे केली. आता शेतकरी तुमच्यासाठी काय करणार आहेत?