शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

डॉक्टर करतात झाडांचे आॅडिट!

By admin | Updated: July 11, 2016 23:48 IST

अहमदनगर : दर रविवारी डॉक्टरांनी एकत्र यायचे.... एखादी कॉलनी निवडायची... तेथे २० ते २५ झाडे लावायची... त्याच दिवशी पूर्वी लावलेल्या झाडांचे आॅडिट करायचे...

अहमदनगर : दर रविवारी डॉक्टरांनी एकत्र यायचे.... एखादी कॉलनी निवडायची... तेथे २० ते २५ झाडे लावायची... त्याच दिवशी पूर्वी लावलेल्या झाडांचे आॅडिट करायचे... एखादे झाड जळाले तर तेथे पुन्हा नव्याने लावायचे.., असा वृक्ष संवर्धनाचा अविरत कार्यक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी शहरातील ८० डॉक्टरांनी एकत्र येत ‘प्लॅनेट ग्रुप’ स्थापन केला आहे.समाजातील डॉक्टर हा घटक सर्वांत व्यस्त असतो! अनेकवेळा कुटुंबालाही वेळ देणे डॉक्टरांना शक्य नसते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर त्यांच्याच व्यवसायात २४ तास व्यस्त असतात. मात्र वृक्षारोपण कार्यक्रमातील वास्तव जाणणाऱ्या डॉक्टरांनी स्वत:चे चार तास पर्यावरण संवर्धनासाठी देण्याचा निर्धार केला. त्यातूनच दर रविवारी एकत्र येवून शहरात झाडे लावण्यासाठी डॉक्टर एकत्र येत आहेत. लोक झाडे लावतात, फोटो काढतात आणि पुन्हा झाड आले की नाही, याकडे दुर्लक्ष करतात. हीच खंत डॉक्टरांना होती म्हणून डॉक्टरांनीच झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ‘प्लॅनेट ग्रुप’ची स्थापना केली. या ग्रुपमध्ये सध्या शहरातील ८० डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. दर रविवारी एक कॉलनी निवडायची आणि तेथे जावून २० ते २५ झाडे लावायची, असा त्यांचा कार्यक्रम निश्चित झाला. आतापर्यंत शहरातील ८ ते १० कॉलनीमध्ये झाडे लावली आहेत. लावलेले झाड आले की नाही, याची पाहणीही दर रविवारी केली जाते. झाडांचे हे आॅडिट अफलातून आहे. झाड वाळले किंवा जळाले असेल तर तेथे पुन्हा नव्याने झाड लावले जाते. वृक्षारोपण झाल्यानंतर लगेच ‘ट्री गार्ड’ बसविले जाते. त्यामुळे ती झाडे जनावरांनी खाण्याचा प्रश्नच येत नाही.बालरोगतज्ज्ञ डॉ. श्याम व स्मिता तारडे यांनी प्लॅनेट ग्रुपसाठी पुढाकार घेतला. या ग्रुपमध्ये डॉ. अभिजित व रेणुका पाठक, धनंजय व सुमा वाघ, दर्शन व वैशाली गोरे, राजीव व मनीषा सूर्यवंशी, प्रताप पटारे, सचिन वहाडणे, पियुष खंडेलवाल यांच्यासह तब्बल ८० डॉक्टर सहभागी आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हा ग्रुप झाडे लावत आहे. आतापर्यंत ट्री गार्डसह २५० झाडे लावण्यात आली आहेत, असे डॉ. श्याम तारडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)