1) लसीकरण : घरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्ती, पालक लहान मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्ती व शिक्षक यांनी लसीकरण करून घ्यावे.
मुलांचे कोविड लसीकरण चालू होईल तेव्हा त्यांचे लसीकरण करून घेणे.
मुलांचे नेहमीचे लसीकरण चालू ठेवणे. फ्ल्यूचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे.
2) मास्क : पालकांनी स्वतः नियमित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करून मुलांना मास्क वापरण्यासाठी उत्तेजन द्यावे.
वारंवार साबणाने हात धुवावे. दोन वर्षांपुढील मुलांनी मास्क वापरावा. रंगीबेरंगी आकर्षक मास्क मुलांना दिल्याने त्यांनाही ते आवडेल. मुलांना इतर मुलांबरोबर खेळू देऊ नये.
3) स्क्रीन टाईम : टीव्ही बघण्यासाठी वेळ नियंत्रित करावी. नकारात्मक बातम्या, घटनांची चर्चा मुलांसमोर टाळावी, मुलांबरोबर पालकांनी खेळावे .
4) घरगुती कामांमध्ये : स्वच्छता करणे , बाग काम करणे इ. घरगुती कामामध्ये मुलांना गुंतवावे. मुलांची सामाजिक, भावनात्मक वाढ होण्यास मदत होते.
5) ऑनलाईन शाळा : ऑनलाईन क्लासेसमध्ये जास्त ॲक्टिव्हिटी ब्रेक असावेत.
6) सामाजिक सहभाग : ऑनलाईन शिक्षणात मदत करण्यासाठी पालकांचे गट करून त्यांची मदत घ्यावी.
7) नियोजित शिक्षण : क्रियाकल्प आधारित शिक्षण (ॲक्टिव्हिटी बेस्ट प्लान लर्निंग) दिल्याने मुलांच्या वाढीला मदत होईल. (एनसीईआरटीच्या वेबसाईटची मदत घेता येईल.)
8) घरातील एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह असल्यास त्याने एका रूममध्येच राहावे. घरात सुद्धा मास्क वापरावा.