शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मद्याकडेच पाहू नका; रोजगारही महत्वाचा

By admin | Updated: April 22, 2016 00:16 IST

अहमदनगर : दारु निर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल,

अहमदनगर : दारु निर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे टाळले़ महसूलमंत्री खडसे गुरुवारी नगर दौऱ्यावर आले होते़ शासकीय विश्रामगृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ मद्यासाठी पाणी देण्याबाबत पत्रकारांनी छेडले असता खडसे यांनी वरील भूमिका मांडली़ केवळ एक बाजू पाहून निर्णय घेता येणार नाही, तर त्यासाठी सर्व बाजंूनी विचार होणे गरजेचे आहे़ मद्यनिर्मितीबरोबरच तेथील रोजगारही महत्वाचा असतो. त्यामुळे सर्व बाजूनी विचार करून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी द्यायचे किंवा नाही, याबाबत सरकार निर्णय घेईल,असे सांगून खडसे यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले़ मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे़ कुठेही पाणी कमी पडणार नाही़ वाट्टेल ते करू, प्रत्येकाला पाणी मिळेल याची सरकार व्यवस्था करेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत़ हा धागा पकडून खडसे यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वापरलेल्या पाण्याकडे अंगुली निर्देश केला़ ते म्हणाले लातूर येथील विलासराव देशमुख यांच्या कारखान्याने मांजरा धरणातील पाणी वापरले़ ते पाणी कारखान्याने वापरले नसते, तर लातूर शहरावर जलसंकटच ओढावले नसते, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़सेल्फीचे खडसे यांच्याकडून समर्थनग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वत: चा फोटो काढण्यासाठी सेल्फी काढला नाही तर काम केल्याचा आनंद त्यांना झाला़ त्यामुळे त्यांनी तो सेल्फी काढला़ त्यात काही गैर नाही, असे मला वाटते़ विरोधकांकडे मुद्दा नाही़ त्यामुळे ते कोणत्या न कोणत्या मुद्यावरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला़ आता मोटारीनेच दौराहेलिपॅडसाठी ५ ते १० हजार लीटर पाणी वाया जाते़ ते वाया जाणार नाही, यासाठी यापुढे मोटारीनेच नव्हे तर पायीसुध्दा दौरे करण्याची आमची तयारी असल्याचे सांगून, मीडियाच आमचे अजेंडे ठरवित असल्याची कोटी त्यांनी यावेळी केली़