शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जाहीरातबाजी नको, कडक कायदे करुन अंमलबजावणी करा : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 19:56 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने सध्या नुसता जाहीरातीवर जोर दिला आहे. प्रत्येक कामाची मोठ्या उत्साहात जाहीरात केली जात आहे. मात्र जाहिरातींमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आजिबात सुटणार नाहीत. देशात भ्रष्टाचार थांबलेला नाही.

ठळक मुद्देकेंद्र सरकारवर हजारे यांची टीकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले पत्रदिल्लीत करणार पुन्हा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : केंद्र सरकारने सध्या नुसता जाहीरातीवर जोर दिला आहे. प्रत्येक कामाची मोठ्या उत्साहात जाहीरात केली जात आहे. मात्र जाहिरातींमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आजिबात  सुटणार नाहीत. देशात भ्रष्टाचार थांबलेला नाही. कुठेही महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे जाहीरातबाजी न करता केंद्र सरकारने कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची भुमिका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हजारे यांनी पत्र पाठविले आहे. पत्रामध्ये विविध मागण्यांसाठी दिल्लीत पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन करण्याचाही इशारा हजारे यांनी या पत्रात दिला आहे.

सरकारने निवडणुकीवेळी जनतेला भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासन दिले. याच मुद्द्यावर सरकार सत्तेत आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून हजारे यांनी पत्रात उल्लेख केला आहे.  आपण सत्तेवर विराजमान झाल्यानंतर बदलला. भ्रष्ट्राचारासंबंधी एकही निर्णय तुम्ही घेतला नाही. माझ्या पत्रांना उत्तरेही मिळाले नाहीत. 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेला भ्रष्ट्राचार थांबविण्याच्या उपायासाठी काहीही आवाहन केलेले नाही. नागरिकांच्या हितासाठी लोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले. त्याचे कायद्यातही रुपांतर झाले मात्र सरकारकडून अंमलबजावणी होत नाही. सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या तीन वर्र्षांच्या काळात शेतक-यांसाठी काहीही केलेले नाही. मजूर, गरीब जनता यापेक्षा  उद्योगपतींची जास्त काळजी आपणाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आली आहे.  दिल्लीतील आंदोलनाचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही हजारे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

हजारे यांनी या पत्राच्या प्रती लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रपतींनाही या पाठविल्या आहेत.