शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

करंजी घाटात प्रवाशांची ‘दिवाळी’ : माणुसकीला काळीमा फासणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 11:18 IST

तेलाचे डबे भरून मुंबईहून जालन्याकडे चाललेल्या ट्रकला नगर -पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात पलटी झाला.

ठळक मुद्देतेलाचा ट्रक उलटला, चालक ठार

करंजी : तेलाचे डबे भरून मुंबईहून जालन्याकडे चाललेल्या ट्रकला नगर -पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात पलटी झाला. यात ट्रकचा चालक खाली अडकला. मदतीसाठी तो याचना करित असताना येणा-या-जाणा-या प्रवाशांनी माणुसकी न दाखविता तेलाचे डबे लांबविले. प्रवाशांनी चालकाला मदत न केल्यामुळे चालक जागीच ठार झाला. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कंरजी घाटात घडली.मुंबईहून तेलाचे डबे, पिशव्या, खोके घेवून जालन्याकडे जात असलेला (एम.एच -२०, ए.टी.-२३६३) ट्रक नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर अंदाज न आल्याने पलटी झाला. ट्रक पलटी झाल्याने ट्रक ड्रायव्हर संदिप टेकाळे हा ट्रकखाली दबला होता. घटनेची खबर ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी जावून गावातील युवकांनी तेलाच्या डब्याने भरलेला ट्रक खाली करून ट्रक ड्रायव्हरला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला. मात्र मदतकार्य चालू असताना येणा-या -जाणा-या प्रवाशांनी वाहनातून तेलाच्या डब्याची, खोक्यांची अक्षरश: लूट केली. त्याच्याबरोबर असलेला ट्रक मालक शाम हरिश्चंद्रे मात्र या अपघातातून सुखरूप बचावला. ट्रक रस्त्यातच पलटी झाल्याने घाटात मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी झाली. ग्रामस्थ मदतकार्य करित असताना येणा-या -जाणा-या प्रवाशांनी ट्रकखाली सापडलेल्या ड्रायव्हरला वाचविण्याऐवजी तेलाचे डबे, खोके अक्षरश: लुटले. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. घाटाच्या खाली महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखेची चौकी आहे, मात्र दीड तास या अपघाताकडे कुणीही आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांत, प्रवाशांत संताप व्यक्त केला जात होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी