शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘सेवाप्रीत’ने बांधली दिव्यांगांची लग्नगाठ : लग्न सोहळ्याचा केला सर्व खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:26 IST

बदलत्या काळानुसार मुला-मुलींचे लग्न जुळविणे अवघड बनले आहे़ मुलगा आणि मुलगी दिव्यांग असेल तर या अडचणीत आणखीच भर पडते़

अहमदनगर : बदलत्या काळानुसार मुला-मुलींचे लग्न जुळविणे अवघड बनले आहे़ मुलगा आणि मुलगी दिव्यांग असेल तर या अडचणीत आणखीच भर पडते़ येथील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने मात्र शहरातील अनामप्रेम संस्थेने आधार दिलेल्या दोन दिव्यांग जोडप्यांचा मोठ्या थाटात विवाह लावून देत त्यांच्या सुखी संसाराखी गाठ बांधली़सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी आपल्या परीने मदत करत एखाद्या शाही विवाह सोहळ्याप्रमाणेच नगर शहरातील एका हॉटेलमध्ये या विवाहाचे आयोजन केले होते़ दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे़ अनामप्रेम संस्थेच्या पुढाकाराने ८ महिन्यापूर्वी दिव्यांग असलेल्या राहुल महामाहिम यांचा मोनिका फिस्के यांच्याशी तर धनंजय साळुंखे यांचा श्वेता इंगळे यांच्याशी विवाह ठरला. विवाह ठरलेल्या चारही जणांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विवाहाचा खर्च कसा पेलवायचा हा प्रश्न होता़ अनाम प्रेम संस्थेने सेवाप्रीतच्या सदस्यांपुढे हा विषय मांडला़ यावेळी संस्थेच्या सदस्यांनी क्षणाचाही विचार न करता लग्नाची तारीख ठरवण्याचे सांगून, संपूर्ण लग्न लाऊन देण्याची तयारी दर्शवली. सेवाप्रीतने वधू-वरांच्या कपड्यांपासून मंगळसूत्र तर लग्नातील पाहुण्यांच्या जेवणाची सर्वोत्तम व्यवस्था केली होती़ पाहुण्यांचे स्वागत अनामप्रेमचे अजित माने यांनी केले. हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर, गीतांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड, डॉ.सिमरन वधवा, सविता चड्डा, रितू वधवा, कशीश जग्गी, अनुभा अ‍ॅबट, रुपा पंजाबी आदिंनी परिश्रम घेतले.विवाह झालेली मोनिका फिस्के ही स्नेहालयाच्या स्नेहाधारची माजी विद्यार्थिनी आहे. तिचे वडील फुगे विकून आपला उदरनिर्वाह करतात तसेच तिची आई मानसिकदृष्ट्या आजारी आहे़मोनिकाने बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन स्नेहालयाच्या जनसंपर्क विभागात काम केले होते़ सध्या ती पुणे येथे नोकरी करुन पदवीचे शिक्षण घेत आहे.राहुल महामाहिम याने नगरच्या पाऊलबुधे महाविद्यालयात इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तो सध्या औरंगाबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. दुसरे दांम्पत्य धनंजय हा सातारा येथील असून, त्याची पत्नी श्वेता श्रीरामपूर येथील आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय