शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे जिल्हाभर धरणे

By admin | Updated: October 19, 2016 01:06 IST

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़

अहमदनगर : पाच टक्के आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांनी मंगळवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे धरले़ अकोले आणि पारनेर तालुक्यात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सरकारने मुस्लिमांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा जमियत- उलमा ए हिंद संघटनेच्या वतीने यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़ मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले़ नगरमध्ये जमियत- उलमा ए हिंद संघटनेचे अध्यक्ष इर्शादउल्ला मकदुमी, व सचिव सय्यद खलील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते़ सकाळी ११ वाजता समाज बांधवांनी धरणे सुरू केले़ दरम्यान जिल्ह्यातील अकोले व पारनेर तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांतील मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयांसमोर धरणे सुरू केले़ तहसीलदारांना निवेदन देऊन ५ टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली़ जिल्ह्यासह तालुका पातळीवर एकाच दिवशी आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला़ आघाडी सरकारने दिलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा मिळावे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली़भारतीय मुस्लीम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाली आहे़ मुस्लीम समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून, त्यामुळेच मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते़ तत्कालीन सरकारने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा आदेश दिला होता़ नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण लागूही झाले़ न्यायालयाने मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण वैध ठरविले होते़ परंतु, यासंदर्भात सरकारने कोणतेही ठोस भूमिका घेतली नाही़ परिणामी मुस्लिमांचे आरक्षणही अधांतरीच राहिले़ भाजपा सरकार सत्तेवर येऊन बराच काळ लोटला़ परंतु, सरकारने याबाबत एकदाही भूमिका मांडली नाही़ सरकारात मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कमालीची उदासीनता असून, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे़ सरकार मुस्लिमांना आरक्षण देण्यास जाणीवपूर्वक चालढकल करत असून, मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा़ मुस्लिमांच्या न्याय मागण्यांकडे सरकारने कानाडोळा करू नये, अन्यथा राज्यभर आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आला आहे़ मौलाना अन्वर नदवी, सय्यद खलील, नसीर शेख, निसार बागवान, हाजी शौकत तांबोळी, मुस्तफा खान, सय्यद वहाब, उबेद शेख आदींची यावेळी भाषणे झाली़