शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनांनी दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय

By admin | Updated: April 20, 2016 23:42 IST

अहमदनगर : तलाठी संघाचे धरणे आणि दावणीला अनुदान देण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले़

अहमदनगर : महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, सातबारा संगणकीकरणातील सुधारणेसाठी तलाठी संघाचे धरणे आणि दावणीला अनुदान देण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले़ कर्मचाऱ्यांच्या ‘काम बंद’चा अभ्यंगतांना फटका बसला़ संपूर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच महसूलच्याच कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ नायब तहसीलदारांच्या पगारात वाढ, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठीचा त्यांचा गेल्या काही दिवसांपासून लढा सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर नगरच्या महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई वगळता इतर विभागातील सुमारे दीड हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते़ तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या बाजूला तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी ठाण मांडले होते़ तलाठी सजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना, सातबारा संगणकीकरणातील त्रुटी दूर करणे, या मागणीसाठी तलाठी संघाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले़ जनावरांच्या छावण्या सुरू न करता दावणीला प्रति जनावर २०० रुपये अनुदान द्यावे, मागेल त्याला काम आणि कर्जमाफी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली़ महसूल कर्मचारी व तलाठी यांची भाषणे आणि कम्युनिस्टांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला़जिल्ह्यात सलग चार वर्षांपासून दुष्काळ सुरू आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर सरकारने कमी करावा, अशी मागणी यावेळी कम्युनिस्ट व किसान सभा जिल्हा कौंन्सिलचे अ‍ॅड़ कॉ़ सुभाष लांडे, शांताराम वाळुंज, बाळासाहेब पाटील, सुधीर टोकेकर आदींनी निवेदनाद्वारे केली़ तलाठी महासंघाच्या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष ज्ञानदेव भुजबळ यांनी केले़ आंदोलनात सुरेश जेठे, कार्याध्यक्ष बाळासाहेब सुद्रिक, लक्ष्मीकांत रोहकले, गणेश जाधव, संतोष तनपुरे आदींचा सहभाग होता़ महसूल कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचे नेतृत्व भाऊसाहेब डमाळे यांनी केले़ उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, सरचिटणीस विजय धोत्रे, कोषाध्यक्ष कैलास साळुंके आदींचा आंदोलनात सहभाग होता़(प्रतिनिधी)