शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्हा बँक भरतीचा करारनामा अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर

By सुधीर लंके | Updated: April 25, 2020 17:21 IST

शेतक-यांना पीक कर्ज देताना सर्व कागदपत्रे तपासून घेणा-या जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे काम देताना ‘नायबर’ या संस्थेसोबत अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा केला आहे

सुधीर लंकेअहमदनगर : शेतक-यांना पीक कर्ज देताना सर्व कागदपत्रे तपासून घेणा-या जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे काम देताना ‘नायबर’ या संस्थेसोबत अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा केला आहे. नोटरी वकिलासमोर हा करारनामा करण्यात आला. त्यापोटी मुद्रांक शुल्कही भरलेले दिसत नाही.जिल्हा बॅकेच्या भरतीत लिपिक, ज्युनिअर आॅफिसर, प्रथम श्रेणी अधिकारी व द्वितीय श्रेणी अधिकारी अशा सर्व पदांसाठी एकूण १७ हजार ७२ उमेदवारांनी अर्ज केले होते. भरतीला अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी कमीत कमी शुल्क ७०० तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी शुल्क ६५० रुपये होते. म्हणजे जिल्हा बँकेकडे १ कोटी १० लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली. बँकेने ‘नायबर’ या एजन्सीकडे भरती प्रक्रिया राबविण्याचे काम दिले होते. या एजन्सीला प्रती उमेदवार ५५० रुपये सेवा शुल्क व सेवा कर दिलेला दिसतो. याचा अर्थ या एजन्सीला बँकेने भरतीपोटी कमीत कमी ९३ लाख रुपये दिले. एवढ्या मोठ्या रकमेचा करारनामा बँकेने नोटरी वकिलासमोर केवळ शंभर रुपयांच्या मुद्रांकावर केला आहे.‘नायबर’ संस्था कोणाची?‘नायबर’या संस्थेची नोंदणी मुंबई पब्लिक ट्रस्ट व सोसायटी अ‍ॅक्टनुसार झालेली आहे. या संस्थेला ‘नाबार्ड’ने बँक भरतीच्या पॅनेलवर कसे घेतले? हा तपशील अजून समोर आलेला नाही. या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव मुकुंद भालचंद्र भालेराव व कोषाध्यक्ष मुकुंद अनंत भस्मे यांना जिल्हा बँकेसोबत भरतीचा करारनामा करण्याचा अधिकार देण्यात आला होता.बॅकेच्या वतीने अध्यक्ष सीताराम गायकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्या करारनाम्यावर स्वाक्ष-या आहेत. बँकेने भरतीची जाहिरात १० जून २०१७ रोजी दिली. मात्र भरती प्रक्रिया राबविणा-या ‘नायबर’ सोबतचा करारनामा उशिराने १८ जुलै २०१७ रोजी केला. नायबरचे पदाधिकारी कोण, भरतीसाठी ते कोणते कर्मचारी वापरणार हा काहीही तपशील करारनाम्यात नाही.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पाठराखणबँकेने नोकरभरतीची जाहिरात अगोदर दिली व भरती राबविणा-या ‘नायबर’सोबतचा करारनामा उशिरा केला आहे. कामाच्या व्यापामुळे करारनामा नोटराईज करणे राहून गेले, असे उत्तर यावर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी चौकशी समितीला दिले. ही गंभीर बाब आहे. मात्र, त्यानंतरही बँकेने मुख्य कार्यकारी अधिका-यांचे कामकाज चांगले आहे, असा ठराव करत पाठराखण केली.बँकेने स्टॅम्प पेपरवर करारनामा केलेला आहे. मुद्रांकशुल्क भरलेले नाही. किती रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केला ते तपासून सांगतो. -रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district bankनगर जिल्हा सहकारी बँक