शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेबाबत बुधवारी मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारच्या नगर दौऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत माहिती घेतली. आमदार संग्राम ...

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारच्या नगर दौऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत माहिती घेतली. आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. बँक निवडणुकीबाबत २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी या बैठकीला यावे. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. मंगळवारी (दि. २५) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत संगमनेरला बैठका घेतल्या. या बैठकांना भाजपचे काही नेते उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर पवार रविवारी नगर दौऱ्यावर असताना त्यांनी जगताप यांच्या निवासस्थानी सर्व माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, माजी आमदार पांडुरंग अभंग, उदय शेळके, घनश्याम शेलार, नगरध्यक्षा अनुराधा आदिक, आदी उपस्थित होते.

खा. पवार यांनी उपस्थित नेत्यांबरोबर जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. महाआघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहून ही निवडणूक लढवावी, अशी सूचना पवार यांनी केली. निवडणुकीच्या नियोजनासाठी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत यावे, असेही आवाहन पवार यांनी केले. प्रारंभी आमदार जगताप यांनी पवार यांचे स्वागत केले. यावेळी पार्वती जगताप, जि. प. सदस्य सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डॉ. शशिकांत फटके, डॉ. वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप उपस्थित होते.

--------

फोटो- २४ शरद पवार-जगताप मीट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी चर्चा केली. त्यांच्यासमवेत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अरुण जगताप, चंद्रशेखर व नरेंद्र घुले, राहुल जगताप, पांडुरंग अभंग.