शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ युरोप दौ-यावर : पदाधिका-यांना सुकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:12 IST

जिल्ह्यातील बळीराजा दुष्काळाने होरपळत असताना जिल्हा बँकेतील संचालक मंडळाला मात्र युरोप वारीचे डोहाळे लागले आहेत़

अहमदनगर : जिल्ह्यातील बळीराजा दुष्काळाने होरपळत असताना जिल्हा बँकेतील संचालक मंडळाला मात्र युरोप वारीचे डोहाळे लागले आहेत. अभ्यास दौरा, या गोंडस नावाखाली ही सहल आयोजित करण्यात आली असून, पुढील आठवड्यात संचालक मंडळ मौजमजा करण्यासाठी युरोप दौ-यावर जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांच्या दौ-यावर आहेत. सततच्या दुष्काळाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना ते बांधावर जाऊन धीर देण्याचे काम करत आहेत़ जिल्हा सहकारी बँकेत याच पक्षाची सत्ता आहे़ जिल्हा बँकेची शेतक-यांशी पिढ्यान पिढ्यांची बांधिलकी आहे़ ज्यावेळी शेतकरी अडचणीत येतो, त्या त्यावेळी त्यांच्या मदतीला बँक धावून जाते, असे शेतकरी आणि बँकेतील हे अतूट असे नाते आहे़ पक्षाच्या नेत्यांची नाळ शेतक-यांशी जुळलेली आहे़ मात्र पक्षाच्या नेत्यांची ही भूमिका त्यांच्याच पक्षाच्या संचालक मंडळाकडून पायदळी तुडविली जात असल्याने सर्वसामान्य शेतक-यांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे़शेतक-यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी संचालक मंडळाने विदेशात जाऊन अभ्यास करावा, असा शिरस्ता आहे़ गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे़ परंतु, सध्याचा काळ वेगळा आहे़ शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे़ पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली़ पण, शेतीची मशागत कुठून आणि कशी करायची, असा शेतक-यांसमोरचा पहिला प्रश्न आहे़खरिपाची पिके उभी करण्यासाठी खिशात खडकूदेखील नाही, अशी शेतक-यांची स्थिती आहे़ पण, याच शेतक-यांच्या घामाच्या पैशावर हे संचालक मंडळ विदेशात मौजमजाच करणार आहे़ त्यापलीकडे काहीही होणार नाही़ यापूर्वीच्या अभ्यास दौ-यांत संचालक मंडळांनी काय दिवे लावले़ त्यांच्या या अभ्यास दौ-यांमुळे बँकेचे आणि पर्यायाने शेतक-यांच्या जीवनमानात काय सुधारणा झाल्या, याचा अभ्यास करण्याची वेळ आता शेतकरी सभासदांवर आली आहे़जिल्हा बँकेचे २१ जणांचे संचालक मंडळ आहे़ संचालक मंडळाच्या युरोप अभ्यास दौ-यासाठी बँकेने निविदा मागविल्या होत्या़ दोन निविदा प्राप्त झाल्या असून, त्यांच्याशी वाटाघाटी सुरू आहे़ ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील आठवड्यात दौ-याची तारीख निश्चित केली जाईल़.-रावसाहेब वर्पे, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा सहकारी बँक.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय