शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे़

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे़ मतदानयंत्रे शहरात दाखल झाली असून,राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित यंत्रणांची मंगळवारपासून तपासणी केली जाणार आहे़ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नागपूर औद्योगिक वसाहतीच्या वखार महामंडळाच्या गोदामात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़विधानसभा निवडणुकीच्या हालचाली जोरात सुरू आहेत़ राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे़ निवडणुकीसाठीची आचारसंहितेबाबत मात्र प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात आहे़ आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, असे बोलले जात आहे़ त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागानेही तयारी सुरू केली आहे़ मतदार यादीही निवडणूक शाखेने जाहीर केली आहे़ मतदान प्रकियेसाठी सन २००६ नंतरचे मतदानयंत्रणे वापरावीत, अशी सूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे़ त्यानुसार उत्तरप्रदेशातून ११ हजार यंत्रे मागविण्यात आली होती़ ही यंत्रणे वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहेत़ परिसरात चोवीसतास पोलिसांचा खडा पाहारा आहे़ दाखल झालेली यंत्रे चालतात का, बटन व्यवस्थित आहे किंवा नाही,यंत्रात काही बिघाड आहे काय,याची तपासणी करण्यासाठी नागपूर येथील इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन इंडिया कंपनीचे प्रतिनिधी येणार आहे़ त्यांच्याकडून मंगळवारी सकाळी १० वा.पासून यंत्रांची तपासणी सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यंत्र तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर ते जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत़ त्यापूर्वी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खात्री केली जाईल़ मतदानाच्यावेळी त्या-त्या केंद्रांवर हे यंत्र पाठविले जाणार आहेत़ विविध राजकीय पक्षांना तपासणीच्यावेळी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे़ तसे पत्र त्यांना देण्यात आले आहेत़ त्यांच्या उपस्थितच यंत्रणांची तपासणी होणार असून, ही तपासणी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल़ त्यामुळे यावेळेतच राजकीय प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे़