अहमदनगर : शहरातील फेरीवाला व पथविक्रेत्यांना शासनाने जाहीर केलेले दीड हजार रुपयाचे सानुग्रह आनुदान तात्काळ वितरित करावे, अशी मागणी नगर शहर हॉकर्स सेवा संघाचे अध्यक्ष शाकीर शेख व भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगर महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी १३ एप्रिल २०२१ रोजी फेरीवाले व पथविक्रेत्यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. तसा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. सदर निधी लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत. परंतु, याबाबत महापालिकेकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम तातडीने फेरीवाला व पथविक्रेत्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
फेरीवाल्यांना सानुग्रह आनुदान वितरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:21 IST