शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर पालिका विषय समित्यांचा वाद न्यायालयात; सत्ताधारी व विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:18 IST

नगरपालिकेत विषय समित्या गठित करण्याचा विषय औरंगाबात उच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. यासंदर्भात भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक असलेल्या नगरसेवक बाळासाहेब गांगड व संतोष कांबळे यांनी याचिका दाखल केली आहे.

श्रीरामपूर : नगरपालिकेत विषय समित्या गठित करण्याचा विषय औरंगाबात उच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. यासंदर्भात भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक असलेल्या नगरसेवक बाळासाहेब गांगड व संतोष कांबळे यांनी याचिका दाखल केली आहे. एकाच वेळी सत्ताधारी व विरोधी या दोन्ही गटांना शह देण्याची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून पालिकेत विषय समित्यांच्या निवडी रखडलेल्या आहेत. त्याला तांत्रिक कारण आहे. सत्ताधारी शहर विकास महाआघाडी व विरोधी काँग्रेस या दोन्ही गटांकडे गटनेता नाही. दोन्ही गटांचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. शहर विकास महाआघाडीकडून भाजपच्या भारती कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार तर काँग्रेसकडून संजय फंड व अंजूम शेख यांच्यात गटनेतेपदाचा वाद आहे. जिल्हाधिकाºयांनी तीन वेळा विषय समित्यांच्या निवडीकरिता कार्यक्रम घेऊन कुठलाही निर्णय होऊ शकला नव्हता. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी बोलविली. बैैठक याच तांत्रिक अडचणीमुळे तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी विषय समित्या निवडीसाठी बैैठक बोलवत पुन्हा ती रद्द करत असल्याचे पत्र जारी केले होते. पालिकेत पूर्वी नगराध्यक्षा अनुराधा आदिक तसेच उपनगराध्यक्ष करण ससाणे या गटांमध्ये नगरसेवकांचे विभाजन होते. आता मात्र भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी पालिकेच्या राजकारणात थेट लक्ष घातले आहे. त्यामुळे ३५ नगरसेवकांमधील अनेकजण विखे यांच्या सोबत गेले आहेत. यात नगराध्यक्षा आदिक व ससाणे यांना पूर्वी मानणा-या नगरसेवकांचाही समावेश आहे. विषय समित्या गठित करण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे याचिकाकर्ते बाळासाहेब गांगड व संतोष कांबळे हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. नगराध्यक्षा आदिक व भाजप नेते राधाकृष्ण विखे या दोघांचे ते समर्थक आहेत. विषय समित्या स्थापन करण्यात सत्ताधारी व विरोधी दोन्ही गट रस दाखवत नव्हते. या पार्श्वभूमीवर दोघा नगरसेवकांनी याचिका दाखल करून सर्वांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

पालिकेचे सर्व कामकाज एकाच व्यक्तीला पाहणे शक्य नाही. विषय समित्यांची तयार झाल्यास जबाबदारीची विभागणी होते. कामकाजात सुसूत्रता येते. आमचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे नगरसेवक संतोष कांबळे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरPoliticsराजकारण