शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत,चाºया रिकाम्याच : कमी दाबाने पाणी सोडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:47 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कआढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. गेल्या महिनाभरापासून कर्जत आणि करमाळा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सुरु असताना श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरु झाले की पाण्याचा दाब कमी का होतो ? हा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शुक्रवार ( दि. १७ ) पासून श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला कुकडीचे आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी जाहीर केले. पहिल्या दिवशी चारी क्र. १४, १३ आणि १२ ला  टेल टू हेड पध्दतीने पाणी सुरु झाले. परंतु दुपारनंतर कुकडीच्या मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब कमी होऊन सोडलेल्या चाºया बंद झाल्या. तिन्ही चाºयांपैकी एकाही चारीचे पाणी टेल पर्यंत पोहोचले नाही. शनिवारी फक्त चारी क्र. १३ आणि १४ ला कमी दाबाने पाणी सोडले, मग नियोजनाचे काय ? असा सवाल शेतकरी करीत आहेत.कोरोनाच्या संकटामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना कुकडीच्या पाण्याचे नियोजन कोलमडल्यामुळे उभी पिके आणि फळबागा धोक्यात आल्या आहेत. उन्हाळा वाढल्यामुळे सर्वांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. उन्हाळी पिकांसह फळबागांना पाणी आवश्यक असल्यामुळे आवर्तन सुरळीतपणे पार पडण्याची अपेक्षा  शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. --कोटकुकडीचे आवर्तन सुरळीतपणे पार पडणार असून सर्व शेतकºयांना पूर्ण दाबाने पाणी देणार आहे. भरणे झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही. -स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता, सिंचन शाखा,श्रीगोंदा. ---

फोटो आढळगाव ( ता. श्रीगोंदा )  शिवारात कुकडी चारी क्र. १३ चे टिपलेले छायाचित्र. चारीमध्ये पाण्याची पातळी पाहूनच पाण्याचा दाब लक्षा