शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
4
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
5
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
6
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
7
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
8
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
9
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
10
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
11
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
12
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
13
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
14
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
15
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
16
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार
17
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
18
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
19
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
20
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार

शिस्त हीच खरी जीवननिष्ठा-विष्णू महाराज पारनेरकर,घराघरात साजरा झाला पूर्णवाद ई-महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:06 IST

अहमदनगर : देवाला व्यवस्था आवडते. व्यवस्थेसाठी शिस्त असणे महत्त्वाचे असते. शिस्त ही आनंदाने पाळली गेली पाहिजे. आनंदाने शिस्त पाळली तरच ती खरी जीवननिष्ठा म्हणता येईल, असे प्रतिपादन पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी केले.

अहमदनगर : देवाला व्यवस्था आवडते. व्यवस्थेसाठी शिस्त असणे महत्त्वाचे असते. शिस्त ही आनंदाने पाळली गेली पाहिजे. आनंदाने शिस्त पाळली तरच ती खरी जीवननिष्ठा म्हणता येईल, असे प्रतिपादन पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी केले.पूर्णवाद परिवाराच्या दत्त प्रतिष्ठापना महोत्सव आणि गुरु-शिष्य मेळाव्याला दरवर्षी हजारो शिष्यगण पारनेरमध्ये येतात. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा पूर्णवाद परिवाराचा महोत्सव घराघरातून साजरा करण्यात आला. ‘उत्सव तुमच्या घरी, पूर्णवाद राहो अंतरी’ या घोषवाक्यासह साजरा झालेल्या या ई-महोत्सवात आपल्या घरातूनच हजारो शिष्यांनी सहभाग घेतला. राज्याच्या विविध भागातून वेबिनारवर व्याख्याने, संगीत मैफल, भजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत झालेल्या या ई-मेळाव्यात विष्णू महाराज यांनी शिष्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, वेद आणि संगीत यांची सेवा जीवनात आनंद प्रदान करते. वेद म्हणजे कृती किंवा संकल्प आहे. संगीत म्हणजे आनंद आहे. संगीतामुळे जीवनात सर्वोच्च आनंद मिळतो. वेदनिष्ठा आणि देवनिष्ठा दोन्हीही आवश्यक आहेत. स्वधर्म समजून निष्ठा अंगी बाळगता आली पाहिजे. व्यक्ती म्हटले की परमार्थ गरजेचा आहे. ज्ञानामुळे अहंकार होतो. त्यामुळे शिष्य आहे, याचे सतत स्मरण व्हावे, यासाठी जीवनात गुरू आवश्यक आहे. या महोत्सवात अ‍ॅड. गुणेश पारनेरकर यांना पूर्णाचार्य, तर लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी प्रज्ञावंत पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक उपासकांचा सत्शिष्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. राज्यभरातील उपासकांनी आपापल्या घरी यंदा पूर्णवाद महोत्सव उत्साहात साजरा केला. २२ मे रोजी या ई-महोत्सवाचा समारोप होणार आहे. समितीचे अध्यक्ष गुलजारसिंह राजपूत, उपाध्यक्ष गणेशराव जहागीरदार यांच्यासह अनेकांनी या ई-महोत्सवासाठी परिश्रम घेतले.--