शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी येथील कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज, जिल्ह्यातील १४ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:50 IST

अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाथर्डी येथील कोरोना बाधित व्यक्तीला काल डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ४१ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाथर्डी येथील कोरोना बाधित व्यक्तीला काल डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ४१ झाली आहे.शनिवारी सायंकाळी हे प्रलंबित १४ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. निगेटिव्ह आलेल्या अहवालात शेवगाव येथील ०१, जामखेड ०२, संगमनेर-०१, राहाता- ०२, नगर शहर- ०५, अकोले ०१, राहुरी ०१ आणि कोपरगाव येथील ०१ व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथील मोहोज देवढे येथील शेतकरी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने रुग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार बाधित व्यक्तीला दहा दिवसातं कोणताही त्रास होत नसेल, त्याची प्रकृती चांगली असेल तर त्याला डिस्चार्ज देण्यात येऊन घरीच १४ दिवस क्वारंटाईन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या रुग्णाला काल डिस्चार्ज देण्यात आला.जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १८३२ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १७३० जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या एकूण १८ जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.