शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगार सवलतींपासून वंचित

By admin | Updated: June 26, 2016 00:34 IST

श्रीगोंदा : भारताची अर्थव्यवस्था ज्या ८५ टक्के असंघटित कामगारांवर अवलंबून आहे, त्यांना कोणत्याच सवलती मिळत नाहीत

श्रीगोंदा : भारताची अर्थव्यवस्था ज्या ८५ टक्के असंघटित कामगारांवर अवलंबून आहे, त्यांना कोणत्याच सवलती मिळत नाहीत आणि ज्यांच्यावर १५ टक्के अर्थव्यवस्था अवलंबून आहे, असे संघटित कामगार मात्र वेतनाचे, सुट्टीचे आणि विविध प्रकारच्या रजेचे लाभ मिळविण्याचा अधिकार आहे परंतु असे असंघटित कामगार सवलतीपासून वंचित आहेत, अशी खंत श्रीगोंदा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश वर्षा पारगावकर यांनी व्यक्त केली आहे. श्रीगोंदा बार असोसिएशन व श्रीगोंदा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व श्रीगोंदा तालुका विधी सेवा समितीच्यावतीने बाल कामगार आणि असंघटित कामगार या विषयावरील शिबिरात अध्यक्षपदावरून न्या. पारगावकर बोलत होत्या.न्या. पारगावकर म्हणाल्या, घरगुती कामावर येणाऱ्या महिला जेवढ्या दिवस गैरहजर राहतात, तेवढ्या दिवसांचा त्यांचा पगार कापला जातो. त्यांना साप्ताहिक सुट्टी नसते, कोणत्याही प्रकारची पगारी रजा नसते. देशातील सर्वच असंघटित कामगारांची ही अवस्था आहे. बालकामगारांविषयी त्या म्हणाल्या, १४ वर्षाच्या आतील बालकांना काम देणे, हा गुन्हा आहे. त्यामध्ये घरगुती आणि हलक्या स्वरुपाची कामे अपवाद आहेत. बालकामगारांना कष्टाची कामे दिल्याने त्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर परिणाम होतो म्हणून बालकामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या सामाजिक संस्थांना समाजाने आर्थिक सहकार्य केले पाहिजे. न्या. पारगावकर यांनी एका गरीब कुटुंबातील आईवर कविता सादर केली. या कवितेने न्या. पारगावकर यांच्यासह संपूर्ण सभाग्रह गहिवरले.‘बालकामगार कायदा व असंघटित कामगारांची अवस्था’ यावर संजय पटवा, प्रा. तुकाराम दरेकर, अ‍ॅड. नितीन कुलकर्णी, न्या. एम. आर. जाधव, न्या. पंकज अहिर यांनी आपली मते मांडली. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. एच. नागवडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास न्या. के. एम. कायंगुडे, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर, नगराध्यक्षा सुनीता शिंदे, सतीश पोखरणा, सतीश बोरा, सुदाम कोथींबिरे, उपनगराध्यक्ष अख्तर शेख, नगरसेवक तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)