शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्षभेद विसरून विखे-थोरात यांनी मदत केली : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 19:09 IST

विधानसभेत आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मोठी मदत केली. ‘सेल्फी प्रकरणा’वरून टीका झाल्यानंतर थोरात यांनी पक्षभेद विसरून आपली पाठराखण केली होती, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

संगमनेर : विधानसभेत आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मोठी मदत केली. ‘सेल्फी प्रकरणा’वरून टीका झाल्यानंतर थोरात यांनी पक्षभेद विसरून आपली पाठराखण केली होती, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.संगमनेर तालुक्यातील ओझर येथील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे होत्या. यावेळी व्यासपीठावर दुग्ध, पशुसंवर्धन व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा दुगा तांबे उपस्थित होते.विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आयोजित करीत असलेल्या ‘परळी फेस्टिव्हल’वर मुंडे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, देवाच्या नावाखाली तेथे काय चालते याची सर्वांना माहिती आहे. शुद्धीकरण करण्यासाठी शेवटी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ठेवले जाते.ते आपले ‘पाहुणे’आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्व. विलासराव देशमुख व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे यांच्या कामाचेही कौतुक केले. कार्यक्रमासाठी येताना पशुसंवर्धन मंत्र्यांपुढे शेतकऱ्यांनी दूध अनुदानाचा प्रश्न उपस्थित करण्याची माझ्याकडे मागणी केली. परंतु जानकर हे आज आपले ‘पाहुणे’ असल्याचे थोरात यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.दुधाला अनुदान देणारा पहिला मंत्री...आमदार थोरात यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जानकर म्हणाले, दूध अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अनुदानापोटी तीन दिवसात ९० कोटी रुपये देणारा राज्य, नव्हे तर देशातही मी पहिला मंत्री आहे. उर्वरित अनुदान येत्या आठ दिवसात देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर