शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नगर-पुणे रेल्वेचा मार्ग मोकळा : दिलीप गांधी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 10:59 IST

नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले़

अहमदनगर : नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनचे सुरू असलेल्या कामाबाबत गांधी यांनी शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, इंदापूरचे प्रांताधिकारी संजय अस्वले, रेल्वे बोर्डाचे प्रतिनिधी आर.एन.गुप्ता व दौंड येथील तहसीलदार आदी उपस्थित होते.नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनच्या कामासाठी आतापर्यंत जवळपास ९० टक्के जमिनींचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनासाठी ज्या शेतक-यांच्या अडचणी आणि तक्रारी होत्या त्यांच्यासमवेतही यावेळी यशस्वी चर्चा करून तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता लवकरच कॉड लाईनचे सुरु असलेले काम पूर्ण होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. रेल्वेच्या या मार्र्गामुळे नगरकरांचा पुण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. दीड ते दोन तासात पुण्याला जाणे शक्य होणार असून, यामुळे वेळ व पैशाचीही बचत होणार आहे़ नगर-पुणे अशी रेल्वे सुरू झाल्यानंतर नगर-पुणे महामार्गावरील रहदारीवरही परिणाम होऊन अपघातांचे प्रमाण कमी होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.दौंडचा वळसा टळणारनगर-पुणे असा रेल्वे मार्ग नसल्याने नगरच्या प्रवाशांना दौंडमार्गे जाणा-या रेल्वेतून पुणे येथे जावे लागत होते. रेल्वेचा दौंडमार्गे हा प्रवास पाच ते सहा तासांचा होता. आता नगर- काष्टी (ता. श्रीगोंदा) - पुणे असा रेल्वे मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम मार्गी लागल्यानंतर नगरकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर