शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक सुधारणेतील डिजिटल गुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 14:37 IST

अध्ययन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी विविध अ‍ॅप तयार करणारे सरदवाडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे डिजिटल गुरू शिक्षक रवींद्र भापकर यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना नुकताच केंद्र शासनाचा नॅशनल आयसीटी अ‍ॅवार्ड जाहीर झाला आहे.

अशोक निमोणकर  ।  जामखेड : दिवसेंदिवस शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. हळूहळू शाळेतील फळ्याची जागा स्मार्ट बोर्ड, अ‍ॅँड्रॉईड टीव्ही घेत आहे. मुलांच्या हाती पाटीऐवजी टॅब येत आहेत. हे सर्व आशादायक चित्र आहे. अशाच पद्धतीने अध्ययन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी विविध अ‍ॅप तयार करणारे सरदवाडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे डिजिटल गुरू शिक्षक रवींद्र भापकर यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना नुकताच केंद्र शासनाचा नॅशनल आयसीटी अ‍ॅवार्ड जाहीर झाला आहे. तालुक्याला प्रथमच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.रवींद्र भापकर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध ई सहित्याची निर्मिती केली आहे. त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी स्वत: शैक्षणिक वेबसाईट तयार केली आहे.  या वेबच्या माध्यमातून कथा, कविता, पाठ्यपुस्तके, आॅनलाईन टेस्ट, आॅफलाईन टेस्ट, विविध अ‍ॅप्स मोफत डाउनलोड करता येतात. राज्यातील लाखो शिक्षक व विद्यार्थी या वेबचा नियमित वापर करतात. या वेबला ३० लाखाहून अधिक लोकांनी भेटी दिल्या आहेत.शाळेत ४५ विद्यार्थी असून शाळेचे दोनही वर्ग डिजिटल आहेत. दोनही वर्गात इंटरअ‍ॅक्टिव बोर्ड बसवले आहेत. या बोर्डसाठी अमेरिकेतून मदत मिळाली आहे. माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनीही शाळेसाठी इ साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शाळेसाठी लोकसहभागातून लाखो रूपयांची मदत मिळाली. शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ६० शाळांचा विदेशातील अनिवासी भारतियांशी ग्लोबल नगरी व्हिडिओ कॉन्फरंसिंग कार्यक्रमाद्वारा संवाद घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.१०० कार्यशाळांचे आयोजनभापकर हे देशभर तंत्रस्नेही शिक्षक म्हणून मार्गदर्शन करतात. त्यांनी आतापर्यंत भोपाळ (मध्य प्रदेश), अजमेर (राजस्थान), दिल्ली या ठिकाणी तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी जवळपास १०० ठिकाणी तंत्रस्नेही कार्यशाळा घेवून शिक्षकांना तंत्रज्ञानाची गोडी लावली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAhmednagarअहमदनगर