शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल चालकाकडे मागितली तीन लाखांची खंडणी, हिंदू राष्ट्र सेनेचे दिगंबर गेंट्याल याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:45 IST

अहमदनगर: नगर शहरातील हॉटेल व्यवसायिकाकडून तीन लाखांची खंडणी मागत एक लाख रुपये स्वीकारत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला सोमवारी सायंकाळी शहरातील माळीवाडा परिसरातून अटक केली.

अहमदनगर: नगर शहरातील हॉटेल व्यवसायिकाकडून तीन लाखांची खंडणी मागत एक लाख रुपये स्वीकारत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला सोमवारी सायंकाळी शहरातील माळीवाडा परिसरातून अटक केली.

या प्रकरणातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारु विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी  अर्ज केला होता. सदर अर्जावरुन त्यांना दारु विक्रीचा परवाना मिळाला होता. दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याने सदर परवाण्याबाबत माहीतीच्या अधिकारात अर्ज करून उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्या कागदपत्राचे आधारे परवाना दिला याबाबतची माहीती मागवुन घेतली होती.

 सदर माहीतीचे आधारे गेंट्याल हा  तक्रारदार यांना सदर हॉटेल परवाना हा नियमानुसार मिळाला नसुन त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या वरीष्टांकडे तक्रारी करुन तुझा हॉटेल परवाना रदद करतो . अशी धमकी देत तीन लाख रुपयांची मागणी करत होता. याबाबत सदर हॉटेल व्यावसायिकाने जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार दिली होती.

पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा अर्ज वर्ग करून कारवाई करण्यास सांगितले होते त्यानुसार उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिशिरकुमार देशमुख , सोळके, मेढे, कॉन्स्टेबल रविंद्र पांडे , दत्तात्रय गव्हाणे, रविद्र कर्डीले , पोकॉ संदिप दरंदले , कमलेश पाथरुट , रोहीत मिसाळ सापळा रचला. तक्रारदार याना सोमवारी सायंकाळी एक लाख रुपये रक्कम सोबत घेण्यास सांगून ठरलेल्या ठिकाणी गेंट्याल  याला पैसे घेण्यासाठी बोलावून घेण्यास सांगितले. काही वेळातच पैसे घेण्यासाठी गेंट्याल माळीवाडा परिसरात आला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी गेंत्याल यच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. े