शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा अन‌् तालुका प्रशासनाच्या कोरोना रुग्णसंख्येत आढळली ४००ची तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

कोपरगाव : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत कोपरगाव तालुक्याचे कमी रुग्ण, तर कोपरगाव प्रशासनाकडील आकडेवारीत जास्त रुग्ण आढळले. यात तब्बल ...

कोपरगाव : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत कोपरगाव तालुक्याचे कमी रुग्ण, तर कोपरगाव प्रशासनाकडील आकडेवारीत जास्त रुग्ण आढळले. यात तब्बल ४०० रुग्णांची तफावत आढळली. आकडेवारीत एवढी मोठी तफावत कशी असू शकते, असे म्हणत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सहायक घटना व्यवस्थापक प्रशांत सरोदे यांच्यावर चांगलेच भडकले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रशासनाने एकत्र येऊन ही लढाई लढावयाची आहे, तर आरोग्य विभाग व प्रशासनाने येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तत्काळ सोडवून घ्याव्यात, अशा सूचना थोरात यांनी केल्या आहेत.

कोपरगावातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री बाळसाहेब थोरात हे रविवारी ( दि.११) कोपरगाव दौऱ्यावर आले होते. कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोपरगाव तालुक्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही. याची प्रशासनाने काळजी घ्यावी. इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही, याची खबरदारी घेऊन ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व कोविड केअर सेंटरला या इंजेक्शनचा पुरवठा करावा. सर्पदंशाच्या इंजेक्शनप्रमाणे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. जेणे करून रुग्णांना याची गरज भासल्यास नातेवाईक डॉक्टरांच्या चिठ्ठीने ते इंजेक्शन नेऊ शकतील. यासह इतरही विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

..........

खासदार लोखंडे यांना केले लक्ष्य..

कोपरगाव तालुक्यात कोरोनाची एवढी भयावह परिस्थिती असताना पालकमंत्री तर सोडाच, परंतु, मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हेदेखील इकडे बघायला तयार नाहीत. तालुक्याला रुग्णवाहिका, अधिकचा मेडिकल स्टाफ उपलब्ध करून देणे गरजेचे असताना तसे होत नाही. यावरून खासदार लोखंडे यांना माजी सभापती सुनील देवकर यांनी चांगलेच लक्ष्य केले होते. त्यावर दोन वर्षांपासून मला निधीच नाही, असे म्हणून लोखंडे यांनी वेळ मारून नेली.