शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ढोकी तलावाला मोठी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 11:56 IST

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील काळू नदीवरील ढोकी तलाव दोनला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून यामुळे तलावातील पाणीसाठा लवकर संपण्याची चिन्हे आहेत.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील काळू नदीवरील ढोकी तलाव दोनला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून यामुळे तलावातील पाणीसाठा लवकर संपण्याची चिन्हे आहेत. या तलावाची साठवण क्षमता ११५ दशलक्ष घनफूट आहे. परिसरातील टाकळी ढोकेश्वर, ढोकी, वासुंदे काकणेवाडी या गावांना उपसा जलसिंचनाच्या माध्यमातून ३५३ हेक्टर क्षेत्राला या तलावाचा फायदा होतो. तलावाच्या सांडव्याच्या आतील बाजूस तलावातून मोठ्या प्रमाणावर गळती चालू असून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. तलावाची गळती न थांबविल्यास हे पाणी उन्हाळ्याच्या आत संपवू शकते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव सात वर्षांनी ओव्हरफ्लो झाला आहे. परंतु जलसंधारण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास शेतकºयांची मोठी हानी होऊ शकते.पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेऊन पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी परिसरातील चारही गावांमधून जोर धरू लागली आहे.---तलाव सात वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्याच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याने लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालून गळती थांबवावी जेणेकरून भविष्यात परिसरातील शेतकºयांना पाण्याची अडचण भासणार नाही व उन्हाळ्यातही शेतीला पाण्याचा फायदा होईल. -महेश पाटील,शेतकरी -------------------------------------------------------------------------------------------यासंदर्भात अधीक्षक अभियंता, प्राधिकरण विभाग, नाशिक यांना प्रस्ताव सादर केला असून पाठपुरावा सुरु आहे. य साठी अभियंता प्रत्यक्ष तलाव पाहणीसाठी येणार आहेत. -रामराजे भोसले, उपविभागीय अभियंता, अहमदनगर -------------------------------------------------------------------------------------------(फोटो २८ टाकळी १,२)- ढोकी नंबर दोन तलावाच्या सांडव्याखालून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरु आहे.